वसगडे येथे विविध विकासकामांचा शुभारंभ : माजी सहकार मंत्री तथा आमदार डॉ विश्वजीत कदम यांची उपस्थिती

वसगडे : माजी सहकार मंत्री तथा आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील वसगडे येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा झाला.यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत करून ग्रामस्थांशी संवाद साधला. यामध्ये महात्मा गांधी रोजगार हमी कुशल योजनेअंतर्गत रस्ता कॉँक्रिटीकरण करणे (३० लाख रुपये), १५ वा वित्त आयोगातून गावातील विविध ठिकाणी बंदिस्त गटार बांधकाम व रस्ता कॉँक्रिटीकरण करणे (१४ लाख रुपये), राजू चौगुले यांचे घर ते आयसीआयसीआय बँक रस्ता सुधारणा करणे (७ लाख रुपये), बाजार रस्ता ते आप्पा ढेरे घर रस्ता काँक्रीटीकरण करणे (३० लक्ष रुपये), प्रमोद सावंत घर ते बबन मोरे घर रस्ता काँक्रीटीकरण व बंदिस्त गटार बांधणे. (५.५० लक्ष रुपये) मौजे वसगडे येथील सुतार वाडा व हजारे वाडा येथे बंदिस्त गटार बांधणे. ९ लक्ष रुपये, आय.सी.आय.सी. आय. बँक ते राजू चौगुले घर रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे.
(७.३५ लक्ष रुपये), राजाराम पवार घर ते डिगु सुतार घर तसेच बंडू गुळवे घर ते अमोल भेंडवडे घर रस्ता डांबरीकरण करणे (१० लक्ष रुपये), आमदार निधीतून बबन चव्हाण यांचे घर ते दिगंबर सुतार यांचे घर व बंडू गुळवी यांचे घर ते अमोल भेंडवडे यांचे घर रस्ता सुधारणा करणे (१० लाख रुपये) आदी कामांचा समावेश आहे.
वसगडे गावात झालेल्या विविध विकासकामांमुळे गावचा कायापालट झाला आहे. गावातील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देत पाणी, रस्ते, वीज, गटार आदी विकासकामे पूर्ण करण्यावर आपला भर असून, आगामी काळातही गावच्या विकासासाठी लागेल तेवढा निधी उपलब्ध करून देऊ. स्व. डॉ. पतंगराव कदम साहेबांचा वारसा पुढे चालवत पलूस-कडेगाव मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी शेवटपर्यंत कार्यरत राहू, अशी ग्वाही आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी दिली.
यावेळी आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी नवरात्रोत्सवाच्या पावन पर्वानिमित्त गावातील देवीमातेचे मनोभावे दर्शन घेतले व सर्वांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठ नागरिक व माता-भगिनींची आस्थेवाईकपणे विचारपूस करत त्यांचे आशीर्वाद घेतले.यावेळी जिल्हा सहकारी बँकेचे संचालक मा. महेंद्रअप्पा लाड, माजी पं. स. सदस्य अमोल पाटील, लोकनियुक्त सरपंच सौ. वृषाली गजानन काशीद, उपसरपंच अजित आदगोंडा पाटील, ग्रा. पं. सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.