श्रीपती शुगर ॲण्ड पॉवर लिमिटेड डफळापूर-कुडणूरच्या बाॅयलर अग्निप्रदीपन व दुसरा ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ प्रसंगी काँग्रेस पक्षाचे नेते उद्योगपती सी आर सांगलीकर यांची उपस्थिती

जत : श्रीपती शुगर ॲण्ड पॉवर लिमिटेड डफळापूर-कुडणूर ता.जत जिल्हा सांगली या साखर कारखान्याच्या बाॅयलर अग्निप्रदिपन व दुसरा ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ प्रसंगी काँग्रेस पक्षाचे नेते उद्योगपती सी आर सांगलीकर यांनी सहभाग घेतला. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
दुष्काळग्रस्त भागात रोजगार निर्मिती, बळीराजाला साथ, वाहतूक आणि आधुनिकरण हे धोरण या कार्यक्रमावेळी स्पष्ट करण्यात आले. कायमस्वरूपी दुष्काळ असणाऱ्या जत तालुक्यातील नागरिकांना या कारखान्यामुळे नवीन आशा आणि प्रेरणा मिळत आहे, असे काँग्रेसचे नेते उद्योगपती सी आर सांगलीकर यांनी भावना व्यक्त केल्या.
सद्यस्थितीमध्ये जत,कवठेमहांकाळ तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी यांना वेळेत ऊस गाळप करण्याची सतत चिंता सतावत होती. या कारखान्यामुळे या भागातील ऊस उत्पादक शेतकरी यांचा ऊस गाळपाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे. दोन्ही तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होणार आहे, असे ही उद्योगपती सी आर सांगलीकर यांनी सांगितले.
या कार्यक्रम प्रसंगी मा.आ.वनश्री मोहनरावदादा कदम, माजी मंत्री आ. विश्वजित कदम साहेब,खासदार विशालदादा पाटील,आ.विक्रमसिंह दादा सावंत,मा.विजयमाला कदम वहीनी,मा.स्वप्नाली कदम,मा. महेंद्र आप्पा लाड,बाजार समिती सभापती सुजयनाना शिंदे,मा.ऋषिकेश लाड,डफळापूरचे सरपंच मा.सुभाष गायकवाड,जनरल मॅनेजर महेश जोशी यांच्यासह सभासद , अधिकारी, कर्मचारी, हितचिंतक आदी मान्यवर उपस्थित होते.