महाराष्ट्र

राहुल बाबासाहेब कदम यांना 2024 चा “स्व. विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार” जाहीर

 

कोल्हापूर : *राहुल बाबासाहेब कदम सर अध्यापक वि.मं.अंबर्डे यांना 2024 चा “स्व. विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार” जाहीर करण्यात आला आहे. विद्यामंदिर अंबर्डे तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी गडमुडशिंगी मध्ये सलग 13 वर्षे नोकरी करून 16 मे 2022 रोजी बदली झाली या अती दुर्गम, डोंगरात वसलेल्या या गावातील शाळेत ज्ञानदानाची काम सुरू केले.. स्पर्धा परीक्षेचे महत्त्व ओळखून या शाळेत स्पर्धा परीक्षेची सुरुवात केली तब्बल चार ते पाच स्पर्धा परीक्षेला या मुलांना बसवले या स्पर्धा परीक्षेमध्ये जवळजवळ 52 शिल्ड शाळेतील मुलांनी प्राप्त केले. स्पर्धा परीक्षेमध्ये मिळालेले प्राविण्य पाहून ग्रामस्थांकडून व पदाधिकारी यांच्याकडून कौतुक व्हायला लागले…शाळेमध्ये गावातील ग्रामपंचायत व दानशूर लोकांच्या मदतीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहे, शाळा रंगकाम,शाळेचे नाव इतकीच नव्हे तर विविध उपक्रम देखील त्यांनी राबवले या उपक्रमामध्ये आजी-आजोबा दिवस, पाककला स्पर्धा ,आषाढी एकादशी,दांडिया, रंगपंचमी, मे महिना सुट्टीत शाळेची सहल असे अनेक उपक्रम रबिवले…इतकेच नव्हे तर दर शुक्रवारी शाळेत वस्ती राहून मुलांचे स्पर्धा परीक्षेचे ज्यादा तास घेतले… परिणाम अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये चमकले…. शाळेचा मुख्याध्यापक चार्ज सांभाळून मुलांच्या मध्ये गुणवत्ता वाढ व विविध उपक्रम राबवण्यामध्ये यशस्वी झाले..याच कामाची दखल घेऊन जो मानाचा पुरस्कार मानला जातो स्व. विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार 2024 त्यांना जाहीर झाला… या आधी त्यांना शासकीय व विविध सामाजिक संस्थांचे तब्बल 12 पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!