कोल्हापूर उद्या महानगर पालिका व सिद्धगिरी जननी यांच्या विद्यमानाने सावित्रीबाई फुले रुग्णालय येथे आय.यु.आय. सेंटरचा लोकार्पण सोहळा

कोल्हापूरः अनिल पाटील
पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या ‘निराधारांना आधार’* या तत्वावर गेल्या एक तपाहून अधिक काळ रुग्णसेवेत समर्पित असणाऱ्या ‘सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरने’ पश्चिम महाराष्ट्रातील एन.ए.बी.एच. मानांकित धर्मादाय श्रेणीतील अग्रेसर ‘सेवाभावी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल’ अशी ओळख निर्माण केली आहे. याच सेवा शृंखलेत आता ना नफा ना तोटा या तत्वावर अत्यंत कमी खर्चात पारदर्शक सेवा देणाऱ्या धर्मादाय श्रेणीतील पहिले ‘सिद्धगिरी जननी’ या आय.व्ही.एफ. टेस्ट ट्यूब बेबी सेंटर कार्यान्वित आहे. सिद्धगिरी जननी व कोल्हापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यामानाने वात्सल्य सुखापासून वंचित असणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकांच्यासाठी आता आय.यु.आय. सारखे महागडे उपचार आता अल्प दरात सावित्रीबाई फुले रुग्णालय येथे उपलब्ध होणार आहेत.
सिद्धगिरी जननी आयव्हीएफ टेस्ट ट्यूब बेबी सेंटर व कोल्हापूर महानगर पालिकेच्या संयुक्त विद्यमानाने मोफत वंध्यत्व निवारण सल्ला केंद्र व अल्प दरात आय.यु.आय. उपचार देणारे महाराष्ट्रातील पहिले शासकीय स्तरावरील केंद्र *‘सृष्टी वंध्यत्व निवारण सल्ला केंद्र व आय.यु.आय. सेंटरचा’* लोकार्पण सोहळा *शनिवार दिनांक १९ जुलै २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता सावित्री बाई रुग्णालय येथे प.पू.काडसिद्धेश्वर स्वामीजी, मा.ना.प्रकाश अबीटकर, मा.आ.राजेश क्षीरसागर, मा. आ.अमल महाडिक, मा.आयुक्त के. मंजूलक्ष्मी व डॉ. वर्षा पाटील यांच्या उपस्थित होणार आहे.* या सेंटर मध्ये वात्सल्य सुखापासून वंचित असणाऱ्या जोडप्यांसाठी मोफत बाह्य रुग्ण तपासणी करण्यात येणार आहे तसेच बेसिक इंट्रा यूटेराइन इन्सेमिनेशन (IUI) हि उपचार पद्धती उपलब्ध करण्यात आली आहे. याशिवाय येणाऱ्या प्रत्येक दांपत्याला सुरुवातीलाच उपचार प्रक्रियेची सर्व माहिती पारदर्शकपणे दिली जाणार आहे.