किर्लोस्करवाडी रेल्वे स्थानक येथे उड्डाणपुलाच्या कामामुळे नागरिकांना त्रास : तहसीलदार निवास ढाणे यांच्याकडून पाहणी
उड्डाण पुलाची भौगोलिक स्थिती नाही : अख्तर पिरजादे

पलूस प्रतिनिधी :-
किर्लोस्करवाडी रेल्वे स्थानक परिसरामध्ये उड्डाणपुलाचे काम चालू आहे या कामामुळे कुंडल किर्लोस्करवाडी रस्त्यावरून जे नागरिक आणि वाहने ये..जा करतात त्यांना खूप कसरत करावी लागत आहे. त्याकडे रेल्वे प्रशासन आणि कॉन्ट्रॅक्टर ढुंकूनही पाहायला तयार नाही. उड्डाण पुलाच्या उखरलेल्या मातीच्या मुळे आणि पावसामुळे रेल्वे स्थानक परिसरा वर अंदाजे 200 मीटर अंतरावरती चिखल पसरला आहे .त्यामुळे वारंवार होणारा पाऊस 200 मीटर पर्यंत असणारा चिखल यामुळे येणारी जाणारी दुचाकी वाहने घसरूनअनेकदा अपघात झाले आहेत किर्लोस्कर कारखान्यामध्ये कामाला जाणारे कामगार पादचारी महिला भगिनी यांनाही खूप त्रास सोसावा लागत आहे .शेजारीच काम चालू असताना त्यांनी अनेक अपघात पाहिलेले आहेत तरी देखील त्याच्यावर उपाय कॉन्ट्रॅक्टर करायला तयार नाही .रेल्वे स्थानकावरील स्टेशन मास्तर ,रेल्वे प्रशासनाचे अधिकारी यांनाही अडचणी दिसतात, परंतु ते तिकडे ढुंकूनही पाहत नाही .त्यामुळे यावर सामाजिक कार्यकर्ते अख्तर पिरजादे माजी सरपंच जयसिंग नावडकर यांनी संबंधित माहिती तहसीलदार निवास ढाणे यांच्याकडे दिली. तात्काळ तहसीलदार निवास ढाणे यांनी घटनास्थळी भेट दिली असता त्यांनाही हे विदारक दृश्य दिसले त्यांनी संबंधित कॉन्ट्रॅक्टरच्या सुपरवायझर आमले मॅनेजर तुषार सामंत यांना सूचना केल्या नागरिकांना रेल्वे प्रवासी यांना कोणताही त्रास झाला नाही पाहिजे या दृष्टीने तुम्ही काम सुरू करा. होणाऱ्या अडचणी दूर करा, खडी टाकून येण्या जाण्याकरिता रस्ता करा अशा सूचना दिल्या आहेत. परिस्थिती चे गांभीर्य रेल्वे प्रशासन आणि कॉन्ट्रॅक्टर यांनी लवकरात लवकर ओळखून या ठिकाणी जवळपास 200 मीटर अंतरावरती खडी टाकून हा येण्या जाण्याकरिता रस्ता करून द्यावा. सांगली जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट आहे .पावसाची धार सतत चालू आहे . उड्डाण पुलाचे काम करणारे कॉन्ट्रॅक्टर यतीन पटवर्धन आणि अमोल जाधव यापैकी कोणीही कामावर हजर नाहीत. ते या अडचणी कडे लक्ष देत नाहीत. लवकरात लवकर या मागण्याकडे लक्ष देऊन हा मार्ग करण्यात यावा अशी मागणी माजी सरपंच जयसिंग नावडकर आणि सामाजिक कार्यकर्ते अख्तर पिरजादे यांनी केली आहे . अन्यथा जन आंदोलन उभारून आम्ही जोपर्यंत हा रस्ता होत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन सुरूच ठेवू असा इशारा यावेळी दिला. यासंबंधीचे निवेदन लवकरच आंदोलनाचा आंदोलनाचे निवेदन तहसीलदार निवास ढाणे यांना देणार असल्याचेही यावेळी पिरजादे सांगितले. यावेळी संतोष गायकवाड ,कुरेश मुजावर, सूरज नदाफ, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना अख्तर पिरजादे म्हणाले की उड्डाणपुलाचा कोणताही फायदा येथील जनतेला होणार नाही .त्याऐवजी दोन रेल्वे गोवा एक्सप्रेस आणि हुबळी दादर एक्सप्रेस या थांबल्या पाहिजेत .उड्डाण पूल उभारून रेल्वे प्रशासन करोडो रुपयांचा चुराडा करत आहे . या पुलावरून ऊस वाहतूक होणे अवघड आहे. उड्डाण पुलाकरिता भौगोलिक रचना किर्लोस्करवाडी रेल्वे स्थानकाची नाही. संबंधितांनी तात्काळ याकडे लक्ष देऊन या पुढची कार्यवाही करावी. सुरू असलेले काम पहावे अशी मागणी ही यावेळी करण्यात आली.किर्लोस्करवाडी रेल्वे स्थानकावर रेल्वे प्रवासी नागरिकांना होणारा त्रास रस्त्याची झालेली दुरावस्था याची पाहणी तहसीलदार निवास ढाणे यांनी केली यावेळी जयसिंग नावडकर, कुरेश मुजावर, संतोष गायकवाड, अख्तर पिरजादे उपस्थित होते.