अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियमाबाबत एकदिवसीय प्रशिक्षण 28 रोजी कार्यशाळा : सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर

सांगली : अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम 1989 सुधारित अधिनियम 2016 याबाबत एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा दिनांक 28 जुलै 2023 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जुना बुधगाव रोड, सांगली येथे आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेस सांगली जिल्ह्यातील सर्व सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते तसेच पुरस्कार प्राप्त व्यक्तींनी उपस्थित रहावे, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त जयंत चाचरकर यांनी केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून या कार्यशाळेत यशदा पुणे चे मास्टर ट्रेनर सुभाष केकन, अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील एम. आर. किल्लेदार तसेच इतर मान्यवरांचे व्याख्यान आयोजीत केले असल्याची माहिती श्री. चाचरकर यांनी दिली.