कृष्णाई नवरात्र महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद
महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती : आमदार डॉ.विश्वजीत कदम सौ.स्वप्नाली ताई कदम यांनी साधला महिलांशी संवाद

पलूस : *शारदीय नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून पलूस येथील भारती विद्यापीठ शैक्षणिक परिसर येथे खास महिलांसाठी आयोजित कृष्णाई नवरात्र महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री मा. आमदार डॉ.विश्वजीत कदम साहेब व सौ.स्वप्नाली ताई कदम* यांनी उपस्थित राहून सर्व उपस्थित माता-भगिनींशी संवाद साधून नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानले.
यावेळी विविध दिग्गज कलावंतांनी सुमधुर संगीत-गाण्यांचे, बहारदार नृत्याचे आणि विनोदाचे सुंदर सादरीकरण करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. सर्वांसमवेत कर्णमधुर संगीत मैफिल, बहारदार नृत्याविष्कार व धमाल कॉमेडीचा मनमुराद आनंद घेतला.
भारती विद्यापीठाच्या माजी विद्यार्थिनी, जागतिक कीर्तीच्या स्कायडायव्हर व अनेक विश्वविक्रम नोंदविणाऱ्या ‘पद्मश्री’ शीतल महाजन यांनी ४ हजार फूट उंचावरून पारंपरिक वेशभूषेत (साडी) विमानातून कार्यक्रमस्थळी उडी मारून उपस्थित नवदुर्गांमध्ये नवा उत्साह, उमेद व प्रेरणा जागवली. त्यांनी स्कायडायव्हिंगची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मनं जिंकली. या महोत्सवास *शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा आदरणीय श्रीमती विजयामाला कदम(वहिनीसाहेब), सांगलीचे खासदार मा. विशाल दादा पाटील, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष मा.महेंद्र आप्पा लाड, सागरेश्वर सहकारी सूतगिरणीचे संचालक मा. श्री.शांताराम बापू कदम, भारती सह. बँकेचे संचालक डॉ.जितेश भैया कदम युवा नेते मा.ऋषिकेश दादा लाड* व सर्व प्रमुख मान्यवर, विविध क्षेत्रातील मान्यवर महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.