पतंगराव कदम यांचे रयत शिक्षण संस्थेसाठी मोलाचे सहकार्य : माजी केंद्रीय मंत्री, खासदार शरदचंद्र पवार
रयत शिक्षण संस्थेच्या आर्टस, सायन्स अॅण्ड कॉमर्स ’कॉलेज, रामानंदनगर (बुर्ली) या महाविद्यालयाचा डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, रामानंदनगर नामकरण सोहळा: दिग्गज मान्यवरांची उपस्थिती

पलूस : गरिबीची जाण असणारे माजी सरकार मंत्री कै. पतंगराव कदम यांनी रयत शिक्षण संस्थेसाठी मोलाचे सहकार्य केले हे आम्ही कदापि विसरणार नाही. रयत शिक्षण संस्थेच्या वाटचालीसाठी आणि वाढीसाठी पतंगराव कदम यांनी गांभीर्याने लक्ष दिले होते, असे रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री ,खासदार शरदचंद्रजी पवार यांनी सांगितले.
ते रयत शिक्षण संस्थेच्या आर्टस, सायन्स अॅण्ड कॉमर्स ’कॉलेज, रामानंदनगर (बुर्ली) या महाविद्यालयाचा डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, रामानंदनगर असा नामकरण सोहळ्यासाठी उपस्थित होते. रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री मा. खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या शुभहस्ते नामकरण सोहळा संपन्न झाला.
यावेळी आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी सांगितले की, स्व. डॉ. पतंगराव कदम साहेब हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. स्वतःसाठी जगण्यापेक्षा जनतेसाठी जगणे हे ब्रीद त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत जपले. एक आदर्श शिक्षक म्हणून त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले. साहेबांनी लक्ष घातले नाही असे एकही क्षेत्र शोधून ही सापडणार नाही. साहेबांचे नाव सदर महाविद्यालयास देण्यात यावे, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी, आजी-माजी विद्यार्थी व शिक्षकांची होती. आज हे कार्य पूर्णत्वास जात असताना आनंद होत असून डॉ. पतंगराव कदम साहेबांच्या विविधांगी कर्तृत्वाचा वारसा या नामकरण सोहळ्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने जपला जाईल, असे सांगितले.
यावेळी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र आप्पा लाड यांनी सांगितले की, स्व. पतंगराव कदम यांनी पलूस कडेगाव मतदार संघातील नव्हे तर महाराष्ट्रातील गोरगरीब लोकांच्या मुलांना शिक्षणाचा हक्क मिळवून दिला.आज रामानंदनगर येथे होत असलेला हा नामकरण सोहळा म्हणजे आमच्यासाठी अविस्मरणीय आहे, असे त्यांनी सांगितले.
रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते जे के बापू जाधव सांगितले की, स्व. पतंगराव कदम यांनी देवा पेक्षाही जास्त लोकांची सेवा केली आहे. 19 वर्षांपूर्वी पतंगराव कदम साहेब यांनी मला घड्याळ भेट दिली होती, त्या घड्याळाची किंमत आज नेटवर चेक केले असता 88 लाख रुपये होते, असा मोठा दिलदार मनाचा माणूस ते होते. रयत शिक्षण संस्थेला लाभलेले अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांचे या संस्थेवर बारकाईने लक्ष असते. रामानंदनगर येथील पतंगराव कदम कॉलेज नक्कीच नवी दिशा घेईल. पतंगराव कदम साहेबांनी दिलेल्या भेटीची आठवण सांगताना जे के बापू जाधव अतिशय भावनात्मक झाले.
यावेळी माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. अनेक लोकांनी देणगी जाहीर केली.
*मा. मोहनराव कदम (दादा) माजी सदस्य, विधान परिषद, मा चंद्रकांत दळवी चेअरमन, रयत शिक्षण संस्था, सातारा, .अॅड. भगीरथ शिंदे, *व्हा. चेअरमन, रयत शिक्षण संस्था, मा.प्रा.डॉ. शिवाजीराव कदम कुलपती, भारती विद्यापीठ (अभिमत विश्वविद्यालय), पुणे, मा.खासदार विशाल पाटील सदस्य, लोकसभा, मा.डॉ. अनिल पाटील संघटक, रयत शिक्षण संस्था*, मा.आमदार अरुण (अण्णा) लाड सदस्य, जनरल बॉडी, रयत शिक्षण संस्था, *मा. महेंद्र (आप्पा) लाड उपाध्यक्ष, रयत शिक्षण संस्था*, मा. विकास देशमुख*, सचिव, रयत शिक्षण संस्था, मा.डॉ.एम.बी.शेख विभागीय चेअरमन, र.शि.सं. दक्षिण विभाग, मा.. रामशेठ ठाकूर सदस्य, मॅनेजिंग कौन्सिल, रयत शिक्षण संस्था, मा.जे.के. (बापू) जाधव सदस्य, मॅनेजिंग कौन्सिल, रयत शिक्षण संस्था* प्राचार्या. डॉ. उज्वला पाटील, उत्तमराव वाळवेकर, सहा. विभागीय अधिकारी द.वि.सांगली रयत शिक्षण संस्था , अँथोनी डिसोझा,सहा. विभागीय अधिकारी द.वि.सांगली रयत शिक्षण संस्था विविध संस्थेचे पदाधिकारी मान्यवर विविध गावातील सरपंच उपसरपंच विद्यार्थी शिक्षक इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.