छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचे कोल्हापूर येथे लोकसभा विरोधी पक्षनेते खासदार राहुलजी गांधी यांच्या हस्ते अनावरण
माजी सहकार मंत्री तथा आमदार डॉ विश्वजीत कदम यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती

कोल्हापूर: कोल्हापूर येथील कसबा बावडा भगवा चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुलजी गांधी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आदरणीय राहुलजी गांधी यांनी सांगितले की”छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आजच्या काळात पुढे घेऊन जाणे म्हणजे संविधानासोबत उभे राहणे आणि सर्वसमावेशक न्यायासाठी प्रयत्न करण्यासारखे आहे. ही भूमिका समस्त महाराष्ट्राला दिशा देणारी आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
याप्रसंगी आमदार सतेज पाटील, शाहू छत्रपती महाराज, रमेश चेन्निथला जी, नाना पटोले जी, बाळासाहेब थोरात जी, विजय वडेट्टीवार जी, सुशीलकुमार शिंदे जी, पृथ्वीराज चव्हाण जी, डॉ. संजय डी. पाटील जी, मालोजीराजे छत्रपती, .रजनीताई पाटील, प्रणितीताई शिंदे, चंद्रकांत हंडोरे, माणिकराव ठाकरे, नसीम खान, विश्र्वजीत कदम, ऋतुराज पाटील, राजूबाबा आवळे, जयश्री जाधव, जयंत आसगावकर, राहुल पी. एन. पाटील यांच्यासह श्रीराम सोसायटीचे सभापती, उपसभापती, आदी मान्यवर या सोहळ्यात उपस्थित होते. असंख्य मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालेला हा आजचा प्रेरणादायी सोहळा समस्त कोल्हापुरकरांच्या कायम स्मरणात राहील.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी पुतळा समितीचे सदस्य, कसबा बावडा, लाइन बाजार वासीय, सर्व तरुण मंडळे यांनी मनापासून सक्रिय सहभाग घेतला होता.