सांगली जिल्ह्यात काँग्रेसची ताकद वाढली : माजी सहकार मंत्री तथा आमदार डॉ विश्वजीत कदम
सांगली येथे सांगली विधानसभा कार्यकर्ता मेळावा : मोठ्या संख्येने काँग्रेस प्रेमींची उपस्थिती

सांगली :
सांगली जिल्ह्यात काँग्रेसची ताकद वाढली आहे. समन्वयाने काम केल्यास विधानसभा निवडणुकीत सांगली जिल्ह्यात पक्षाला मोठे यश मिळेल हा मला ठाम विश्वास माजी सहकार मंत्री तथा आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी व्यक्त केला.
सांगली विधानसभा कार्यकर्ता मेळावा सांगली येथे आयोजित करण्यात आला व नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी आमदार डॉ विश्वजीत कदम साहेब बोलत होते. येणाऱ्या निवडणुकी संदर्भात व इतर काही महत्वाच्या विषयांवर विश्वजीत कदम यांनी चर्चा केली.
यावेळी आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी सांगितले की, सांगली जिल्ह्यात काँग्रेसची ताकद वाढली आहे. समन्वयाने काम केल्यास विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात पक्षाला मोठे यश मिळेल हा मला ठाम विश्वास आहे. आठही मतदार संघात महायुतीची पीछेहाट होण्यासाठी आपण आपल्यापरीने तगडी लढत द्यायची आहे. काँग्रेस विचार तळागाळात रुजवण्यासाठी एकदिलाने काम करून जिंकूया व जनसेवेसाठी कटिबद्ध होऊया असे आवाहन कदम यांनी यावेळी केले.
यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. कार्यकर्ते यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी खासदार विशालदादा पाटील, श्रीमती जयश्रीवहिनी मदनभाऊ पाटील, मा. पृथ्वीराजबाबा पाटील, मा. जितेशभैय्या कदम, प्रा सिकंदर जमादार, काँग्रेस पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.