
भिलवडी : सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील सार्वजनिक वाचनालय भिलवडी यांचे वतीने 58वा वाचन कट्टा ग दि माडगूळकर यांचे साहित्य या विषयावर एक ऑक्टोबर २०२४ रोजी उत्साहात झाला.
अध्यक्ष स्थानिक वाचनालयाचे अध्यक्ष गिरीश चितळे होते प्रारंभी वाचन कट्टा संयोजक व कार्यवाह सुभाष कवडे यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. एक ऑक्टोबर रोजी ग दि माडगूळकरांची जयंती चे औचित्य साधून गदिमांचे साहित्य हा विषय निवडल्याचे सांगितले यावेळी अराजोशी डी आर कदम कुमार चौगुले संजय पाटील सर प्रमोद कुलकर्णी हकीम तांबोळी रमेश चोपडे मेजर उत्तम कांबळे हनुमंतराव शिंदे जी जी पाटील गुरुजी यांच्यासह अनेक वाचकांनी ग दि माडगूळकरांच्या कथा कविता कादंबरी लावणी देशभक्तीपर गीते बालगीते आधी साहित्याचा मागवा आपल्या मनोगतात घेतला कार्यवाहक सुभाष कवडे यांनी देखील गदिमांच्या साहित्य विषयी व विशेषतः बालकवितांच्या विषयी माहिती दिली यावेळी जेष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून जी जी पाटील गुरुजी हरा जोशी एके चौगुले नाना या ज्येष्ठ वाचकांचा ग्रंथ भेट देऊन गिरीश चितळे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला वाचन कट्ट्याचे संयोजन ग्रंथपाल वामन काटीकर विद्या निकम मयुरी नलवडे माधव काटीकर या ग्रंथालयाच्या सेवकांनी उत्तम प्रकारे केले शेवटी सुभाष कवडे यांनी आभार मानून एक नोव्हेंबर चा 59 वा वाचन कट्टा माझे ऑक्टोबर महिन्याचे वाचन हा विषय घेण्यात आल्याचे सांगितले या वाचन कट्ट्यावर सर्व बरेच ग्रंथ प्रेमी व वाचनालयाचे सभासद उपस्थित होते प्रमोद कुलकर्णी यांनी गायलेल्या गीतरामायणातील काही गीतांना उपस्थित आणि उत्तम प्रकारे दाद दिली