बोरगावची संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत विभागीय पथकाकडून पाहणी
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत 2022 -23 चे विभागीय स्तरीय तपासणी

कवठेमहांकाळ : बोरगाव तालुका कवठेमंकाळ येथे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत 2022 -23 चे विभागीय स्तरीय तपासणी झाली .यावेळी विजय मुळीक उपयुक्त विकास पुणे विभाग पुणे,डॉक्टर सोनाली घुले सहाय्यक आयुक्त विकास पुणे श्री.भोसले उप अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सांगली शैलेश सराफ सहाय्य प्रशासन अधिकारी पुणे विशाल बुरकुंडे सहाय्यक आयुक्त कार्यालय पुणे या सर्वांनी विविध विषयाची गुणांकनाप्रमाणे तपासणी केली बोरगावचे ग्रामसेवक सुधीर बनसोडे यांनी सर्व दप्तर दाखविले ग्रामपंचायतचे सर्व काम उत्कृष्ट असल्याचे अधिकारी यांनी सांगितले तालुक्यातील सर्व ग्रामसेवक यांनी सहकार्य केले ग्रामपंचायतीने केलेले विविध उपक्रम सांडपाण्यावरील केळीची बाग, सांडपाण्यावरील एसटीपी प्लांट गावातील नळ कनेक्शन धारक घरांना 100% वॉटर मीटर सार्वजनिक शौचालय गोबर गॅस, प्लॅस्टिक संकलन केंद्र व विविध कामाबाबत समितीने समाधान व्यक्त केले यावेळी किरण साहेब होते उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली जिल्हा परिषद सांगली उदय कुमार कुसुरकर गट विकास अधिकारी पंचायत समिती कवठेमंकाळ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले
कवठेमंकाळ पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्री डी आर गुरव श्री के आर पाटील गट तसेच गटशिक्षणाधिकारी प्रमोद गोफणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर माने विस्तार अधिकारी सतीश सांगले कृषी विस्तार अधिकारी डी आर शिंदे अंगणवाडीच्या प्रकल्प संचालिका सरीता उबाळे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे एमजी चांदोरे यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले.
बोरगावचे लोकनियुक्त सरपंच सौ स्मिता नामदेव पाटील यांनी समितीचे स्वागत केले माजी उपसरपंच .श्री नामदेव पाटील यांनी आभार मानले यावेळी उपसरपंच सुजित पाटील ग्रामपंचायत सर्व सदस्य सर्व कर्मचारी माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी गावातील आजी माजी सरपंच उपसरपंच विविध संस्थांचे पदाधिकारी व बचत गटाच्या सर्व महिला शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.