भिलवडी येथील सार्वजनिक वाचनालय भिलवडीचा 73 वा वाचनकट्टा उत्साहात

दर्पण न्यूज भिलवडी -: सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील सार्वजनिक वाचनालय भिलवडीचा 73 वा वाचन कट्टा उत्साहात झाला.
एक जानेवारी 2026 रोजी 73 वा वाचन कट्टा उत्साहात संपन्न झाला मी वाचलेले बालसाहित्य या विषयावर झालेल्या या वाचन कट्ट्याचे अध्यक्षस्थान गिरीश चितळे यांनी भूषविले होते .प्रारंभी सचिन नावडे निलेश जाधव आणि आदर्श विद्यार्थी सुयश निकम यांचा वाचनालयाचे वतीने ग्रंथ भेट देऊन गिरीश चितळे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला . यानंतर वाचन कट्टा समूहाचे ज्येष्ठ सदस्य श्रीयुत ह.रा .जोशी यांच्या सुंदर पत्रे या पुस्तकातील सुविचारंच्या हस्त पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले व ही हस्तपुस्तिका सर्व उपस्थितांना भेट म्हणून देण्यात आली . यानंतर या वाचन कट्ट्यावर ह रा जोशी विद्या निकम उर्मिला डिसले रमेश चोपडे सर हणमंत शिंदे जयदीप पाटील मयुरी नलवडे जयंत केळकर मेजर उत्तम कांबळे प्रथमेश वावरे जी जी पाटील गुरुजी यांनी वाचलेल्या बालसाहित्याची माहिती सांगितली यावेळी साने गुरुजींची सुंदर पत्रे ,हिरवी हिरवी झाडे शामची आई चंपक मासिक इंद्रजीत भालेराव यांचे बाल वांग्मय संस्कार शिदोरी पुस्तक आजीची शिकवण नक्की येत फास्टर फेणे या पुस्तकांची माहिती सादरीकरणांमध्ये वाचकांनी सांगितली गिरीश चितळे समारोप करताना म्हणाले बाल वांग्मय आजच्या काळात संस्काराच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचे आहे अनेक नामवंत लेखकांनी बाल साहित्य लिहिलेले आहे उपाध्यक्ष डी आर कदम यांनी त्यांच्या पत्नीच्या स्मरणार्थ वाचनालयास दहा हजार रुपयांची देणगी जाहीर केली शेवटी जयंत केळकर यांनी आभार मानले. वाचन कट्ट्याचे स्वागत प्रास्ताविक कार्यवाह सुभाष कवडे सर यांनी केले तर संयोजन मयुरी नलवडे विद्या निकम माधव काटीकर यांनी केले.



