भारतीय बौद्ध महासभा जिल्हा कार्यकारिणीचे पुनर्गठन

दर्पण न्यूज सांगली :भारतीय बौद्ध महासभा, जिल्हा शाखा सांगली (पूर्व व पश्चिम) यांची जिल्हा कार्यकारिणी पुनर्गठन प्रक्रिया दि. ३ व ४ जानेवारी २०२६ रोजी संपन्न होणार आहे.
या पुनर्गठन प्रक्रियेसाठी संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष ॲड. एस. के. भंडारे,
राष्ट्रीय सचिव भिकाजी कांबळे,
महाराष्ट्र राज्याध्यक्ष यु. जी. बोराडे
हे वरिष्ठ पदाधिकारी निवड समिती म्हणून उपस्थित राहणार आहेत.
शनिवार, दि. ३ जानेवारी २०२६ रोजी विटा, आंबेडकरनगर येथील बुद्धविहार येथे सांगली पश्चिम जिल्हा कार्यकारिणीची निवड प्रक्रिया पार पडणार आहे.
तसेच रविवार, दि. ०४ जानेवारी २०२६ रोजी आंबेडकर भवन, विजयनगर (कलेक्टर ऑफिस समोर), सांगली येथे सांगली पूर्व जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात येणार आहे.
या दोन्ही दिवशी जिल्ह्यातील सर्व आजी-माजी पदाधिकारी, बौद्धाचार्य, केंद्रिय शिक्षक/शिक्षिका, सैनिक तसेच सर्व सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
यावेळी संघटनेच्या बळकटीकरणासाठी नवीन कार्यकर्त्यांना संधी देण्यात येणार असून संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याचा निर्धार करण्यात येणार आहे.
संपर्क : ९८९०६५४०२८
प्रति प्रसिद्धीसाठी
रुपेश तामगांवकर
जिल्हाध्यक्ष,
भारतीय बौद्ध महासभा, सांगली (पूर्व)



