महाराष्ट्रक्रीडा

पलूसला शेवटच्या श्रावण सोमवारी निकाली कुस्त्याचे जंगी मैदान अध्यक्ष भरतसिंह इनामदार

 

 

पलूस : प्रथम क्रमांकाची कुस्ती उपमहाराष्ट्र केसरी पै. महेंद्र गायकवाड पुणे विरुद्ध पै. प्रकाश बनकर कोल्हापूर यांच्यात सात लाख रुपये ईनामासाठी होणार पलूस प्रतिनिधी – शंभर वर्षांची परंपरा असलेले पलूसचे ऐतिहासिक कुस्ती मैदान शेवटच्या श्रावण सोमवारी (ता. २) मोठ्या प्रमाणावर भरविण्यात येणार आहे. प्रथम क्रमांकाची सात लाख रुपये इनामाची कुस्ती उपमहाराष्ट्र केसरी पै. महेंद्र गायकवाड पुणे विरुद्ध पै. प्रकाश बनकर कोल्हापूर यांच्यामध्ये होणार आहे, अशी माहिती श्रावण सोमवार कुस्ती कमिटीतर्फे अध्यक्ष भरतसिंह फडनाईक _ इनामदार व सर्व संयोजकांनी दिली.ा मैदानामध्ये. पै.माऊली कोकाटे विरुद्ध पै. हर्षल सदगीर .. पै. पृथ्वीराज पाटील विरुद्ध पै. विशाल भोंडू , पै.माऊली जमदाडे विरुद्ध पै. भारत मदने, वैभव माने विरुद्ध सुबोध पाटील,विक्रम भोसले विरुद्ध प्रसाद सस्ते, पै. सागर तामखडे विरुद्ध पै. प्रशांत जगताप,पै. किरण शिसाळ विरुद्ध पवन भांदुगडे,पै. सनी मदने विरुद्ध पै. मोईन, पै. सुजय तनपुरे विरुद्ध पै. नाथा पवार,पै. रिया भोसले विरुद्ध पै. संस्कृती मुळे,पै. अमृता सीसाळ विरुद्ध पै. प्रतिक्षा बागडी,पै. प्रेरणा पाटील विरुद्ध पै. पल्लवी बागडी ,पै. वैष्णवी सुर्यवंशी विरुद्ध पै. असीन शेख,पै. अक्षय कदम विरुद्ध. धनाजी कोळी या प्रेक्षणीय कुस्त्या होणार आहेत. पलूसच्या मातीतील कुस्ती मैदानास ऐतिहासिक परंपरा आहे. पलूस येथील नवीन बस स्थानकानजीक, पाण्याच्या टाकीजवळ कुस्ती मैदान भरविण्यात आले आहे. पावसाची शक्यता लक्षात घेऊन मैदानास छत घातले आहे कुस्ती मैदान यशस्वी करण्यासाठी पलूस शहरातील सर्व पक्षीय नेते मंडळी एकत्र आल्याने लोकर्गणीला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले. इतर सर्व लहान मोठ्या कुस्त्या शेवटच्या सोमवारी मैदाना दिवशी सकाळी 9ते 12 या वेळेत हुतात्मा स्मारक येथे ठरवल्या जातील या व्यतिरिक्त कोणती कुस्ती मैदानात ठरवली जाणार नाही याची पैलवानी नोंद घ्यावी अशी माहिती कमिटीच्या वतीने देण्यात आली या बैठकीस कुस्ती कमिटीचे सर्व पदाधिकारी सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!