महाराष्ट्रआरोग्य व शिक्षण

शालेय जीवनात मुलींना स्व: संरक्षणासाठीचा स्वतंत्र अभ्यासक्रम सरकारने तयार करावा : ॲड. करुणा विमल यांचे प्रतिपादन

 

 

कोल्हापूरः अनिल पाटील

समाजातील विविध भागात खास करून शालेय जीवनात लहान मुलींवरील अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. पुरुषी विकृत मानसिकतेचे हे लक्षण आहे. यासाठी पुरुष मानसिकता बदलण्यासाठी त्यांचे समुपदेशन होणेही गरजेचे आहे. लहान मुलींवरील वाढता अत्याचार ही समाजासाठी घातक बाबा असून शालेय जीवनात मुलींना स्व: संरक्षणासाठीचा स्वतंत्र अभ्यासक्रम सरकारने तयार करावा असे प्रतिपादन प्रतिरोध सभेच्या मुख्य निमंत्रक आणि आम्ही भारतीय महिला मंचच्या अध्यक्षा ॲड. करुणा विमल यांनी केले आहे.
त्या आम्ही भारतीय महिला मंच, कोल्हापूर आयोजित स्त्रिया आणि लहान मुलींवरील वाढत्या अत्याचारासंदर्भात समाजभान जपणाऱ्या स्त्री-पुरुषांची एकत्रित प्रतिरोध सभेत राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर या ठिकाणी बोलत होत्या.
तत्पूर्वी स्त्री-पुरुष समता प्रस्थापित व्हावी यासाठी अनेक लोक लढले, लढत आहेत, लढतील ही. यातीलच एक समतावादी प्रियकरांने आपल्या जिवलग प्रेयसीला समतेच्या वाटेन येण्यासाठी साद घातलेल समतेच्या वाटेनं, तू खणकावत पैंजण यावं, तू यावं, तू यावं, तू यावं, बंधन तोडीत यावं… या गाण्याने सभेची सुरुवात करण्यात आली.
सदर प्रतिरोध सभेत प्रा. टी. के. सरगर, अनिल म्हमाने, मधुकर शिर्के, विश्वासराव तरटे, डॉ. शोभा चाळके, प्रा. अनुजा कांबळे, मदन पाटील, विजय कुशाण यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
स्वतंत्र महिला पोलीस फोर्स उभा करणे. जलद गतीने न्यायालय चालवणे, यासाठी न्यायालयाची संख्या वाढवणे. पुरुष मानसिकता बदलण्यासाठी प्रत्येक गावात व शाळेत समोपदेशन केंद्र उभा करणे. लहानपणी घरातूनच मुलींना स्वतंत्र स्व: संरक्षणाचे धडे देण्याची योजना राबवणे. अन्याय अत्याचार झालेल्या मुलींचे तात्काळ पुनर्वसन करणे. आदी महत्त्वाचे ठराव या सभेमध्ये एकमताने मंजूर करण्यात आले.
सदर प्रतिरोध सभेमध्ये समतेचे समाजभान जपत कार्य करणाऱ्या स्त्री-पुरुषांनी आपला सहभाग मोठ्या प्रमाणात नोंदवला.
मोहन मिणचेकर, रणजित केळुसकर, सुरेश कांबळे, विमल पोखर्णीकर, अरहंत मिणचेकर, विश्वनाथ कांबळे, वृषाली कवठेकर, डॉ. सुजाता नामे, आदित्य म्हमाने, दीक्षा तरटे, अशोक कांबळे, मंथन जगताप, सई तरटे, गायत्री कांबळे, निवेदिता तरटे, ओम कांबळे, अश्वजीत तरटे, अमिरत्न मिणचेकर, लक्ष्मी पासवान यांच्यासह समतावादी स्त्री पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वागत व प्रास्ताविक अनिता गायकवाड यांनी तर अंतिमा कोल्हापूरकर यांनी सूत्रसंचालन केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!