महाराष्ट्रराजकीय

सांगली येथे माजी सहकार मंत्री डॉ विश्वजीत कदम यांच्या हस्ते सांगली विधानसभेचे काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज (बाबा) पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ

 

 

सांगली : पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ विश्वजीत कदम यांनी २८२-सांगली विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज (बाबा) गुलाबराव पाटील यांच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ आज सांगली येथे श्रीफळ फोडून केला.

डॉ विश्वजीत कदम यांनी सांगितले की, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांवर चालणाऱ्या आपल्या स्वाभिमानी महाराष्ट्राला दिल्ली आणि गुजरातसमोर झुकविणाऱ्या, महाराष्ट्राला विकासाच्या बाबतीत मागे नेणाऱ्या राज्यातील भ्रष्ट भाजप व महायुती सरकारला सत्तेतून घालवून महाराष्ट्राला प्रगतीच्या दिशेने पुढे न्यायचे आहे. महाराष्ट्राची अस्मिता जपण्यासाठी व महाराष्ट्राला गतवैभव मिळवून देण्यासाठी या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी काँग्रेस व महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे, असे आवाहन डॉ विश्वजीत कदम यांनी उपस्थिती मतदारांना  केले.

यावेळी कर्नाटकचे आमदार व काँग्रेस पक्ष निरीक्षक बी. आर. पाटील, ‘भारत जोडो अभियाना’चे राष्ट्रीय समन्वयक योगेंद्र यादव, अरुणकुमार श्रीवास्तव, डॉ. सुखज्योत सिंग, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, शिवसेना नेते शंभुराज काटकर, माजी नगरसेवक मुन्ना कुरणे, शेरखान कुरणे, समशेर कुरणे यांच्यासह काँग्रेस व महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!