जनसुराज्यचे संस्थापक आ. विनय कोरे यांच्या वाढदिवसानिमित्त पूरग्रस्तांना मदत : प्रदेशाध्यक्ष समित कदम
नांदेड येथील पूरग्रस्तांना शालेय साहित्य भरलेला आयशर ट्रक रवाना

दर्पण न्यूज मिरज:- नांदेड पूरग्रस्तांना जनसुराज्य शक्ती पक्षाचा मदतीचा हात, संस्थापक अध्यक्ष आमदार विनय कोरे सावकार यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य भरलेला आयशर ट्रक रवाना झाला आहे. सर्व आपत्तीमध्ये जनसुराज्य पक्ष मदतीला कायम पुढे असणार, अशी माहिती जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम यांनी दिली.
जनसुराज्य शक्ती पक्षाचे विनय कोरे सावकार यांच्या वाढदिवसानिमित्त डिजिटल बाजी इतर खर्च न करता नांदेड येथे पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य पाठविण्यात आले आहे
नांदेड येथे भीषण पूर आल्याने मोठे नुकसान झाले आहे त्यामध्ये अनेक लहान-मोठी घरे पाण्याखाली गेल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे या विद्यार्थ्यांच्या मदतीला जनसुराज्य शक्ती पक्ष धावून आला असून आयशर ट्रक भरून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य पाठवण्यात आले आहे त्यामधे स्कूल बॅग पाण्याचे जार वह्या इत्यादी शालेय साहित्याचा समावेश आहे जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली भरून हे शैक्षणिक साहित्य जिल्हाधिकारी यांच्या ताब्यात देण्यासाठी नांदेड कडे रवाना करण्यात आले यावेळी ज्येष्ठ नेते डॉ महादेव अण्णा कुरणे जिल्हाध्यक्ष आनंद सागर पुजारी शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर पंकज म्हेत्रे नाना घोरपडे शहराध्यक्ष योगेश दरवंदर जत तालुकाध्यक्ष बसवराज पाटील समीर मालगावे अल्ताफ रोहिले ताहीर शेख अश्रफ मनेर जैन समाजाचे भालचंद्र पाटील कीर्ती कुमार सावळवाडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते कोणत्याही आपत्तीमध्ये मदतीसाठी जनसूराज्य शक्ती पक्ष हा कायम पुढे असणार असा विश्वास यावेळी समित दादा कदम यांनी व्यक्त केला आहे