कळंब येथे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर भ्याड हल्ला करणाऱ्या तिवारी याचा निषेध करण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या चौकात रास्ता रोको आंदोलन

दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी (संतोष खुने) :-
महामहिम राष्ट्रपती भारत सरकार यांना उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षक कळंब यांच्या मार्फत निषेध निवेदन देण्यात आले भारत देशातील सर्वोच्च पदावर असलेल्या सर न्यायधीश मा भुषण गवई साहेब यांच्यावर भ्याड हल्ला करत देशविघातक कृत्य करणाऱ्या संविधानावर घाला घालन्याचे काम करणाऱ्या तिवारी राकेश या मनूवादी जातीयवादी विकृत मनोवृत्तीच्या ईसमावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा त्याची वकीलीची सनद रद्द करण्यात यावी यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या चौकात एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या रास्ता रोको आंदोलनाला सतपाल बनसोडे अनिल हजारे सुनील गायकवाड राहूल हौसलमल बजरंग ताटे यांनी संबोधन केले व या मनूवादी जातीयवादी विकृत मनोवृत्तीच्या ईसमावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा असे आशयाचे निवेदन मा पोलीस निरीक्षक कळंब व उपविभागीय अधिकारी उप विभाग कळंब यांना निवेदन दिले या आंदोलनात सतपाल बनसोडे अनिल हजारे सुनील गायकवाड राजाभाऊ गायकवाड शिवाजी सिरसाट अमर गायकवाड धनंजय ताटे बजरंग ताटे रणदिवे सुमीत मुळे राहूल संतोष भांडे किशोर वाघमारे सुरज वाघमारे लखन गायकवाड आकाश गायकवाड डाॅ शंकर कांबळे प्रकाश खंडाळे अॅड विकास राऊत कैलास लोंढे प्रमोद ताटे आप्पासाहेब हजारे सायस हजारे ताज खाँ पठाण मुकेश गायकवाड सोनवणे शितल