पालकमंत्री प्रकाशराव आबिटकर यांचा आजचा कोल्हापूर जिल्हा दौरा

कोल्हापूर, अनिल पाटील
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर जिल्हा दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
रविवार, दि. २६ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता गारगोटी ता. भुदरगड येथील निवासस्थान येथून प्लॉट नं. एफ १२/१ एमआयडीसी पुलाची शिरोली ता. हातकणंगलेकडे प्रयाण. सकाळी ११ वाजता प्लॉट नं.एफ १२/१ एमआयडीसी पुलाची शिरोली ता. हातकणंगले येथे आगमन व राठोड ज्वेलर्स यांच्या नवीन मॅन्युफॅक्चरिंग प्लॅटच्या शुभारंभ सोहळयास उपस्थिती. सकाळी ११. ३० वाजता शिरोली मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन कोल्हापूर (स्मक भवन) प्लॉट नं. ५९ एमआयडीसी पुलाची शिरोली ता. हातकणंगले येथे आगमन व ईएसआयसी हॉस्पीटल भेट व पाहणी.सोयीनुसार शासकीय विश्रामगृह, ताराबाई पार्क कोल्हापूर येथे आगमन व राखीव.सोयीनुसार गारगोटी ता. भुदरगड येथील निवासस्थानी आगमन, राखीव व मुक्काम.


