महाराष्ट्र

महिला डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी राज्यासह देशभरात विशेष उपाययोजना करावी : माजी सहकार मंत्री तथा आमदार डॉ विश्वजीत कदम

पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे एका प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीवर अत्याचार व अमानुष खून केल्याच्या निषेधार्थ पलूस तालुका डॉक्टर असोसिएशनच्या पलूस येथे काढण्यात आलेल्या पदयात्रेत आमदार डॉ विश्वजीत कदम यांचा सहभाग

 

 

पलूस :

महिला डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी राज्यासह देशभरात विशेष उपाययोजना करावी, असे आवाहन माजी सहकार मंत्री तथा आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी केले.

पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे एका प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीवर अत्याचार करून तिचा अमानुष खून केल्याच्या निषेधार्थ पलूस तालुका डॉक्टर असोसिएशनच्या वतीने पलूस येथे काढण्यात आलेल्या पदयात्रेत माजी सहकार मंत्री तथा आमदार डॉ विश्वजीत कदम सहभागी झाले होते. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी सांगितले की,  कोलकाता येथे घडलेली  घटना अत्यंत दुर्दैवी आहे.तीव्र निषेध करण्यापलीकडची व माणुसकीला काळिमा फासणारी आहे. हा खटला जलदगती न्यायालयात चालवून दोषीला कडक शिक्षा झाली पाहिजे. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे महिला भगिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेची सरकारने गंभीर दखल घेऊन सदर तरुणीच्या कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा. 

अहोरात्र रुग्णसेवा करणाऱ्या महिला डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी राज्यासह देशभरात विशेष उपाययोजना करण्याची गरज आहे, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

यावेळी पलूस तालुक्यातील डॉक्टर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!