महाराष्ट्रआरोग्य व शिक्षण

खासदार धनंजय महाडिक यांच्या निधीतून विद्यामंदिर आकुर्डे शाळेस संगणक, प्रिंटर प्रदान

 

 

कोल्हापूरः अनिल पाटील

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचा दर्जा हा निश्चितच चांगला व्हावा असा प्रयत्न संसद रत्न खासदार धनंजय महाडिक यांचा नेहमीच असतो . या अनुषंगाने खासदार धनंजय महाडिक साहेबांच्या निधीतून विद्यामंदिर आकुर्डे या शाळेत संगणक आणि प्रिंटर प्रदान करण्यात येत असून या साहित्याच्या माध्यमातून या शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावत राहावा .असे प्रतिपादन भाजपाचे जिल्हा सरचिटणीस नाथाजी पाटील यांनी केले . आकुर्डे तालुका भुदरगड येथील प्राथमिक शाळेस संगणक प्रदान कार्यक्रमाच्या प्रसंगी ते बोलत होते . अध्यक्षस्थानी आकुर्डेचे सरपंच डॉक्टर रवींद्र पारकर हे होते .
यावेळी बोलताना नाथाजी पाटील पुढे म्हणाले प्राथमिक शाळेचा दर्जा उंचावण्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांचा नेहमीच प्रयत्न असतो . आकुर्डे प्राथमिक शाळेमध्ये विविध शालोपयोगी साहित्य मिळावे यासाठी धनंजय महाडिक युवाशक्तीचे शक्तीजित पवार हे नेहमीच प्रयत्नशील असतात . त्यांच्याच प्रयत्नातून आज आकुर्डे प्राथमिक शाळेला संगणक आणि प्रिंटर उपलब्ध होत आहेत त्याचा लाभ शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना व्हावा अशी अपेक्षा आहे .
यावेळी खासदार धनंजय महाडिक यांच्या निधीतून प्राथमिक शाळेस संगणक आणि प्रिंटर उपलब्ध होण्यासाठी पाठपुरावा केल्याबद्दल माजी ग्रामपंचायत सदस्य शक्तीजीत पवार यांचा सत्कार आकुर्डे चे सरपंच डॉक्टर रवींद्र पारकर व उपसरपंच डी . जी . गुरव सर यांचे हस्ते करण्यात आला .
यावेळी मान्यवरांच्या हस्ते शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र एकल व शिक्षक यांचे कडे संगणक सुपूर्द करण्यात आले .
यावेळी माजी उपसरपंच श्रीकांत कांबळे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय पोवार ‘ सदस्य वैशाली पारकर , महादेव कुंभार , प्रवीण पाटील ,लक्ष्मण कुंभार , हेमंत सुतार, संतोष कुंभार , यांचे सह पालक विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते .
प्रारंभी स्वागत अध्यापक राजेंद्र शिंदे यांनी केले प्रास्ताविक अध्यापक तानाजी सनगर यांनी केले तर आभार अध्यापक सागर सुतार यांनी मानले .

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!