महाराष्ट्र
फाळणी वेदना स्मृती दिनानिमित्त मुख्य प्रशासकीय इमारत कोल्हापूर येथे दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनीचे आयोजन

मुंबई ; – एका दिवसावर येऊन ठेपलेल्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने केंद्रीय संचार ब्यूरो भारत सरकार आणि जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर मधील कसबा बावडा येथील प्रशासकीय इमारतीमध्ये आज फाळणी वेदना स्मृतिदिनानिमित्त आयोजित एका दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले.
कागलचे प्रांताधिकारी प्रसाद चौगुले यावेळी उद्घाटनपर संदेशात देशाला स्वातंत्र्य मिळत असताना झालेल्या फाळणीच्या वेळी घडलेल्या बऱ्यावाईट घटनांचा हा दस्तावेज असलेल्या या प्रदर्शनीला सर्वसामान्य नागरिकांनी भेट देऊन ही दुर्मिळ छायाचित्रे पाहण्याच्या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, जिल्हा माहीती कार्यालयाचे कर्मचारी व इतर शासकीय कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
विनामूल्य प्रवेश असणारी ही दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनी 14 आणि 15 ऑगस्ट रोजी नागरिकांना प्रशासकी इमारत कसबा बावडा येथे तळमजल्यावर पाहता येईल.