चोर समजून अनोळखी व्यक्तींना मारहाण करू नका ; भिलवडी पोलिस ठाण्याचे आवाहन
ती महिला ताब्यात ; संशयास्पद कोण असल्यास संपर्क साधा ; सपोनि भगवान पालवे

भिलवडी : सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून चोरी होत आहेत पोलिसांनी काही चोरांना पकडून ताब्यात घेतले आहे. लोकांनी ही पोलिसांना अतिशय उत्तम सहकार्य केले आहे. , ती संशयास्पद महिला ताब्यात घेतली आहे. अनोळखी व्यक्तींना मारहाण करू नका , संशयास्पद कोण असल्यास संपर्क साधावा, असे भिलवडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भगवान पालवे यांनी केले आहे.
सदर महिले बाबत खात्री करण्यात आलेली आहे, महिलेचे नाव संगिता सदाशिव साळुंखे रा. बारामती असे आहे , तिच्याजवळ असलेल्या दागिन्याबाबत खात्री करण्यात आलेली आहे कोणीही संशयित किंवा चोर समजून कोणालाही मारहाण करू नये.कोणाला काहीही माहिती मिळाल्यास भिलवडी, पलूस पोलीस ठाण्याला माहिती द्यावी. पोलिस कर्मचारी चोरांना पकडण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. अनेक भागात लोकांचे सहकार्य मिळत आहे. घाबरून जाऊ नका एकमेकांना समजून घ्या, सहकार्य करा. काही वाटल्यास डायल 112 ला कॉल करावा, असे आवाहन भिलवडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भगवान पालवे यांनी केले आहे.