महाराष्ट्रआरोग्य व शिक्षण

भिलवडी येथे व्यापारी एकता असोसिएशन भिलवडीच्यावतीने 15 रोजी रक्त दान शिबिर

भारतीय स्वातंत्र्यदिन, साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे जयंती आणि राजमाता अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी दिनाच्या निमित्ताने आयोजन ; लोकांनी सहभाग दर्शवावा

 

भिलवडी:-सांगली जिल्ह्यामध्ये रक्ताचा तुटवडा भासत आहे . त्यामुळे भिलवडी येथील व्यापारी एकता असोसिएशनच्या वतीने भारतीय स्वातंत्र्यदिन, साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे जयंती आणि राजमाता अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी दिनाच्या निमित्ताने 15 ऑगस्ट 24 रोजी सकाळी 9 वाजता भिलवडी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलं आहे. या
शिबिरात रक्तदान करणाऱ्या रक्तदात्याला किंवा त्याच्या नातेवाईकांना म्हणजे आई,वडील,बायको, मुलं,अविवाहित बहीण-भाऊ यांना मोफत रक्त देण्याची व्यवस्थाही आहे.याचबरोबर प्लाझ्मा,प्लेटलेट,रक्तातील तांबड्या पेशी आणि पांढऱ्या पेशी (उपलब्ध असल्यास) हे रक्तातील घटक सुद्धा मोफत दिले जाणार आहेत.

आत्तापर्यंत सुमारे 176 जणांना रक्त, प्लेटलेट्स उपलब्ध करून दिले आहेच. एक छोटीशी भेटवस्तू आणि प्रमाणपत्र ही देण्यात येणार आहे. नागरिकांनी  दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी आपल्या सर्व सहकारी-मित्रांसोबत .रक्तदान करावे. असे आवाहन व्यापारी एकता असोसिएशनच्यावतीने करण्यात आले आहे.

शिबिर सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत
ठिकाण – हनुमान मंदिर, भिलवडी येथे आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!