मौजे – नळवाडी (सावंतपूर) येथे कृषी अधिकारी कार्यालय पलूस आत्मा, ग्रामपंचायत सावंतपुर यांच्या क्षेत्रीय किसान गोष्टी बाबी अंतर्गत आडसाली ऊस पीक उत्पादन वाढ चे चर्चासत्र उत्साहात
पलूस: महाराष्ट्र शासन कृषि विभाग तालुका कृषि अधिकारी कार्यालय पलूस यांचेमार्फत मौजे – नळवाडी (सावंतपुर) ता- पलुस येथे तालुका कृषि अधिकारी कार्यालय पलूस आत्मा, व ग्रामपंचायत सावंतपुर यांच्या संयुक्त विदयमाने , *क्षेत्रीय किसान गोष्टी बाबी अंतर्गत आडसाली ऊस पीक उत्पादन वाढ* या विषयी चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.या कार्यक्रमची प्रस्तावना श्री प्रशांत पाटील ,सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा यांनी केली.प्रमुख मार्गदर्शक मां.श्री डॉ शांतीकुमार पाटील , ऊस तज्ञ, एस व्ही ऍग्रो व श्री अजित पडवळे स्पिक फर्टी लाइझेर यांनी ऊस पिका विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
मा.श्री प्रकाश कुंभार उपविभागीय कृषी अधिकारी विटा,यांनी कृषि विभागाच्या योजना विषयी माहिती दिली या कार्यक्रमासाठी मा.श्री संभाजी पटकुरे तालुका कृषि अधिकारी. पलुस,श्री संजयकुमार खारगे मंडळ कृषी अधिकारी पलुस, मां श्री प्रल्हाद जाधव सरपंच सावंतपूर,श्री अनिल सावंत , उपसरपंच , सावंतपुर गावाचे कृषि सहायक सौ नयना यादव,कृप उदय दोंड , सौ गीतांजली रकटे , कृषि सहायक ,रुपावली कुंभार, कविता कोळी, पुष्पा शेळके, आकाश शेटे, पूनम जाधव, संतोष चव्हाण व गावातील पुरुष व महिला शेतकरी उपस्थित होते.उपस्थितांचे आभार सौ धनश्री काटकर सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा . यांनी मानले व कार्यक्रम संपन्न झाला.