बुर्ली येथील शेतकऱ्याचा सर्पदंषाने मृत्यू
किर्लोस्करवाडी (प्रतिनिधी ):
बुर्ली तालुका पलूस येथील शेतकरी सागर बापू चौगुले वय वर्ष 54 यांचा सर्प दंषाने मृत्यू झाला. एक ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता शेतामध्ये वैरण काढण्याकरिता गेलेल्या सागर बापू चौगुले याला त्याच्या शेतात सर्पदंश झाला.त्याच्यावर डॉक्टर शेंडगे यांच्याकडे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान रात्री त्याचा मृत्यू झाला. नदीकाठी गावांना महापुरा मुळे धोका निर्माण झाला आहे. महापुरा मुळे चार दिवसात अनेक प्राणी हे आपला जीव वाचवण्यासाठी जागा शोधत असतात. त्यामुळे गावामध्ये सापांची संख्या वाढली आहे तसेच मगरीचा वावर सुद्धा असण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी प्रशासनाने उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी नागरिकांतून होत आहे. बुर्ली येथे महापुरामुळे स्मशानभूमी मध्ये पाणी आल्याने सागर चौगुले वर रामानंदनगर येथील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.