महाराष्ट्रसामाजिक

नांद्रे विद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित व्याख्यान, फनी गेम्सला उत्स्फूर्त प्रतिसाद

 

 

 

दर्पण न्यूज नांद्रे : जागतिक महिला दिनानिमित्त नांद्रे विद्यालय, नांद्रे प्राथमिक विद्यालय, नांद्रे यांच्या संयुक्त विद्यमाने, मंगळवार दि. १० मार्च २०२६ रोजी महिलांसाठी फनी गेम्स व ‘चला जरा आरशात पाहू या’ या विषयावरील प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या प्रतिभावंत साहित्यिका वर्षा चौगुले मॅडम या होत्या, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सखी सावित्री समिती सदस्य व ग्रामपंचायत सदस्य सौ. वाले मॅडम उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या प्रारंभी रयत शिक्षण संस्थेचे आराध्य दैवत पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील व रयत माऊली लक्ष्मी वहिनी तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा आणि कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सौ. पाटील एम. एम. मॅडम यांनी स्वागत व प्रास्ताविक करून महिला दिनाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यानंतर पाहुण्यांचा परिचय नांद्रे प्राथमिक विद्यालयाच्या शिक्षिका सौ.कोळी मॅडम यांनी करून दिला.
यावेळी प्रमुख पाहुण्या वर्षा चौगुले मॅडम यांनी ‘चला जरा आरशात पाहू या’ या विषयावर मार्गदर्शन करताना स्त्रीचे समाजातील महत्त्व, तिचे अस्तित्व व स्वतःची ओळख जपण्याची गरज यावर प्रकाश टाकला. तसेच कुटुंबातील सासू-सून नात्यातील संवाद, समजूतदारपणा आणि परस्पर सन्मान यांचे महत्त्वही प्रभावी उदाहरणांद्वारे स्पष्ट केले.
कार्यक्रमात महिलांसाठी विविध फनी गेम्सचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे ही देण्यात आली.या खेळांचे नियोजन व अँकरिंग नांद्रे प्राथमिक विद्यालयाच्या शिक्षिका सौ.सकळे मॅडम व नांद्रे विद्यालयाच्या उपशिक्षिका सौ. आडमुठे मॅडम यांनी केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका सौ. कदम ए. व्ही. व सौ. सकळे मॅडम यांनी केले, तर कार्यक्रमाचे संयोजन, विभागप्रमुख सौ. आडमुठे व्ही. व्ही. मॅडम यांनी केले. कार्यक्रमासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री.आडमुठे जे. ए. सर यांचे मार्गदर्शन व प्रेरणा लाभली.
कार्यक्रमाचे आभार उपशिक्षिका सौ. तांबोळी आर. झेड. मॅडम यांनी मानले.
या कार्यक्रमाला दोन्ही विद्यालयांचे स्कूल कमिटी सदस्य, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, तक्रार निवारण समिती सदस्य, सखी सावित्री समिती सदस्य, विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती सदस्य,ग्रामपंचायत सदस्य तसेच माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!