भिलवडी येथील माजी सहकार मंत्री तथा आमदार डॉ विश्वजीत कदम जनसंपर्क कार्यालय यांच्या वतीने उत्तर भाग सोसायटीचे चेअरमन रमेश पाटील, व्हाईस चेअरमन राजेंद्र पाटील यांचा सत्कार

भिलवडी : सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील माजी सहकार मंत्री तथा आमदार डॉ विश्वजीत कदम जनसंपर्क कार्यालय भिलवडी यांच्या वतीने उत्तर भाग विविध कार्यकारी सहकारी सोसायटी भिलवडीच्या चेअरमन पदी रमेश गणपती पाटील यांची तर व्हाईस चेअरमन पदी राजेंद्र भीमराव पाटील यांची बिनविरोध निवड झाली, यानिमित्ताने सत्कार करण्यात आला.
यावेळी भिलवडी गावचे दक्षिण भाग सोसायटीचे माजी चेअरमन बाळासो मोहिते, माजी उपसरपंच मोहन नाना तावदर,
जनसंपर्क अधिकारी सुहास अरबुणे, चौगुले, व्यापारी संघटनेचे पदाधिकारी जावेद तांबोळी,अम्मुभैया मुल्ला , सामाजिक कार्यकर्ते राहुल कांबळे, राजू कांबळे, उद्योजक सदाशिव कटरे, कॉन्ट्रॅक्टर सचिन पाटील, सनी यादव, दीशा फाउंडेशनचे पदाधिकारी सचिन देसाई, जितेंद्र पाटील, पत्रकार अभिजीत रांजणे, कर्मचारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.उत्तर भाग विकास सोसायटी चेअरमन रमेश पाटील आणि व्हाईस चेअरमन राजेंद्र पाटील यांनी माजी सहकार मंत्री तथा आमदार डॉ विश्वजीत कदम जनसंपर्क कार्यालयातील अधिकारी यांचे आणि उपस्थित ग्रामस्थांचे
आभार मानले.