माजी सहकार मंत्री तथा आमदार डॉ विश्वजीत कदम यांच्या हृदयस्पर्शी गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..!

आज गुरुपौर्णिमा…
पाठीराख्या सारखे सतत पाठीशी राहणारे, ज्योती प्रमाणे तेवत राहून आपल्या शिष्याचे आयुष्य उज्वलित करणाऱ्या गुरूंसमोर नतमस्तक होण्याचा हा आजचा दिवस ! स्व.पतंगराव कदम साहेब माझ्यासाठी वडिल, समाजसेवक, आदर्श राजकारणी, व्यासंगी शिक्षक, सर्वसामान्यांचे आधारवड अशा न संपणाऱ्या रंग छटेचे जणू चित्रच होते व सदैव राहतील. मात्र या सर्व गोष्टीमध्ये साहेब एक गुरु म्हणून मला नेहमीच हवेहवेसे वाटायचे.अनेक वेळा एखाद्या अडथळ्यातून मला बाहेर पडायचं असल्यास मी प्राधान्याने साहेबांचा जीवनपट आठवतो. या परिस्थितीत साहेबांनी काय केलं असतं ? असा साधा विचार जरी केला तरी प्रश्न चुटकीसरशी संपून जातो. आज गुरुपौर्णिमेनिमित्त स्व.पतंगराव कदम साहेबांच्या स्मृती आठवताना त्यांनी शिकविलेल्या मार्गावर समर्थपणे चालण्याची शक्ति मिळावी अशी प्रार्थना करतो आणि ज्ञात-अज्ञात सर्व गुरुजनांचे आभार व्यक्त करतो.
गुरुपौर्णिमा निमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.(आमदार डॉ विश्वजीत कदम यांच्या फेसबुक पेज वरून )