भिलवडी येथील खाजगी मराठी प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांची दिंडी ; माऊलीच्या रिंगण सोहळ्यास भिलवडीकरांचा प्रतिसाद



भिलवडी
भिलवडी शिक्षण संस्थेच्या
खाजगी मराठी प्राथमिक शाळेतील बाल वारकऱ्यांनी आषाढी एकादशी निमित्त काढलेल्या दिंडीस व माऊलीच्या रिंगण सोहळ्यास भिलवडीकरांनी उस्फुर्त असा प्रतिसाद दिला. टाळ मृदुंगाच्या गजरात..
ज्ञानोबा माऊली तुकाराम…विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला…च्या गजरात…माऊलीच्या आश्र्वाच्या सहभागाने भिलवडी शिक्षण संकुलात भव्य असा रिंगण सोहळा संपन्न झाला.
बालवाडी व प्राथमिक विभागप्रमुख प्रा.सौ.मनिषा पाटील,प्रा. जी. एस.साळुंखे,प्रा. एम.आर.पाटील यांच्या हस्ते विठ्ठलाच्या मूर्तीचे पूजन करून दिंडी सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला.भिलवडी गावातील नागरिक बंधू भगिनींनी बालवारकर्यांचे स्वागत केले.
ठिकठिकाणी महिलावर्गांकडून दिंडीचे उत्साहात स्वागत करण्यात आले.भाळी गंधबुक्का लावलेले,भगव्या पताका व तुळशी वृंदावना सोबत सहभागी झालेले पाचशे पेक्षा जास्त बाल वारकरी उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते.
भिलवडी शिक्षण संकुल ते भिलवडी गावातून दिंडी काढण्यात आली.भिलवडी ग्रामपंचायती समोर भिलवडी ग्रामपंचायत सदस्य सौ.रेहाना फकीर,सौ.रेश्मा मुल्ला,सौ.स्वप्नाली रांजणे,सौ.रुपाली कांबळे,सौ.सीमा शेटे,सचिव मानसिंग हाके,माजी उपसरपंच बाळासाहेब मोरे,राहुल कांबळे,माजी सरपंच पांडुरंग टकले,मारुती हराळे उपस्थितीत आरती करून, दिंडी सोहळ्याची सांगता करण्यात आली.ग्रामपंचायत,भिलवडी व शाळेच्या वतीने उपस्थित विद्यार्थी पालकांना प्रसादाचे वितरण करण्यात आले.मुख्याध्यापक सुकुमार किणीकर,संजय पाटील,तुषार पवार,शरद जाधव,विठ्ठल खुटाण,प्रगती भोसले,अर्चना येसुगडे,पूजा गुरव,सारिका कांबळे,प्रियांका आंबोळे, स्वाती भोळे, सुफिया पठाण,करिश्मा शिकलगार, शितल माने आदी शिक्षकांनी दिंडी सोहळ्याचे नेटके संयोजन केले.संत ज्ञानेश्वरी पारायण सोहळा समितीचे घनःश्याम रेळेकर,विकास आरगे,सचिन आरते आदींसह पालक प्रतिनिधींचे विशेष सहकार्य लाभले.


