भिलवडी, अकलखोप येथे महाराष्ट्र शासनाचे महाराजस्व अभियान अंतर्गत शिबिरांचे आयोजन : पलूस तहसीलदार दिप्ती रिठे

दर्पण न्यूज पलूस :- सर्वसामान्य जनता व शेतकरी पांचे महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय कार्यालयाशी संबंधीत दैनंदिन प्रश्न सत्वर निकाली काढणे व महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक, कार्यक्षम व गतिमान करण्याच्या दृष्टीने पलुस तालुक्यामध्ये माहे जुन व जुलै 2025 महिन्यामध्ये पलुस तालुक्यातील असणा-या पलूस, भिलवडी, अकलखोप तसेच कुंडल या मंडळाच्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या अभिनव उपक्रमांतर्गत महाराजस्व अभियान अंतर्गत शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पलूस तहसीलदार दिप्ती रिठे यांनी दिली.
खालील प्रमाणे नियोजन करणेत आलेले आहे.
भिलवडी
05/07/20
अंकलखोप
03/07/2024
या शिबिरात महसूल, विभागातीलआणि संजय गांधी विभागांमार्फत खालील सेवाचा नागरिकांना लाभ देणेत
येणार आहे.
महसूल विभागामार्फत विविध दाखले, रेशन कार्ड, लक्ष्मी मुक्ती योजना आदेश, 7/12 वरील अपाक शेरा कमी करणे, पाणंद/शिव/गावरस्ता नोंदीबाबत आदेश, फेरफार अदालत अंतर्गत वारस नोंद घेऊन फेरफार यांचे वितरण,
– पुरवठा, निवडणूक आणि संजय गांधी योजना विभागांमार्फत विविध अर्ज स्वीकृत करण्यात येणार आहेत. अॅग्री स्टॅग नोदणी करणे,
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 च्या कलम 42 (ब), 42 (क), व 42(8) च्या अनुषंगाने प्राध्यान्याने कार्यवाही – गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमित व बंद झालेले गाडी रस्ते/पाणंद/पांधण/शेतरस्ते/शिवाररस्ते/शेतावर जाण्याचे मार्ग मोकळे करणे तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 चे कलम 143 आणि मामलेदार न्यायालय अधिनियम, 1906 च्या कलम 5 अंतर्गत मंजूर वहिवाटीचे रस्ते मोकळे करणे.
– गाव तिथे स्मशानभूमी/दफनभूमी सुविधा उपलब्ध करुन देणेबाबत.
– शैक्षणिक प्रयोजनासाठी दाखले व नागरिकांना दयावयाच्या सोयी-सुविधा व विविध दाखले
-ई- हक्क, सलोखा योजना,
इत्यादी सेवांचा लाभ सर्व नागरिकांना देणेत येणार असलेने मंडळातील सर्व नागरिकांनी शिबीराचे ठिकाणी हजर राहून या महाराजस्व अभियानांतर्गत शिबीरामध्ये सेवांचा लाभ घेणेत यावा. असे आवाहन तहसिलदर पलूस यांचेतर्फे करणेत येत आहे, अशी माहिती पलूस तहसीलदार दिप्ती रिठे यांनी दिली.