चांदेकरवाङी येथील वादग्रस्त पानंद रस्ता खुला करण्याचे प्रांताधिकारी यांचे आदेश

कोल्हापूरः अनिल पाटील
राधानगरी तालूक्यातील चांदेकरवाडी येथील कॅनाॅकङे जाणारा वादग्रस्त पानंद रस्ता अखेर राधानगरीचे प्रांत आधिकारी प्रसाद चौगुले यांनी खुला करण्याचे आदेश दिले आहेत.
गेल्या दोन ते अडीच वर्षापासून गावातील काही शेतकऱ्यांचा हद्दीवरून पानंद रस्त्याचा वाद सुरु होता. तक्रार केल्यानंतर सुरुवातीला तोडगा न निघाल्या मुळे ग्रामपंचाय व संबंधित शेतकऱ्यांनी राधानगरी तालूक्याच्या तहसीलदार अनिता देशमूख यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. . त्यानंतर तहसीलदारांनी सबंधीत जागेवर भेट देऊन पाहणी केल्यानंतर ग्रामपंचायतीच्या बाजूने निकाल दिला होता .त्यानंतर ज्या शेतकर्याने ही जागा अङविली होती त्या शेतकर्याने प्रांताधिकारी यांच्याकडे दाद मागितली होती. त्यामुळे प्रांताधिकारी यांनी प्रत्यक्ष पानंद रस्त्याला भेट देऊन या जागेची पाहणी केली होती. त्यानंतर ग्रामसभेमध्ये ठरल्याप्रमाणे पानंद रस्त्यासाठी पन्नास पन्नास टक्के शेतजमीन देण्याचा ठराव, संबंधित शेतकरी व ग्रामपंचायत यांच्याशी चर्चा तसेच तहसीलदार राधानगरी यांनी दिलेला पूर्वीचा आदेश या सर्व बाबी लक्षात घेता अपिलार्थी यांचे फेर निर्णय अपील नामंजूर करून संबंधित वादग्रस्त पानंद रस्ता तातडीने खुला करण्याचे आदेश प्रांत अधिकारी यांनी दिले आहेत. गेल्या अनेक वर्षाचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी या निर्णया चे स्वागत करून समाधान व्यक्त केले आहे.
ग्रामपंचायतीकङून सरपंच सौ. सिमा हिंदूराव खोत””उपसरपंच सौ. स्वाती बबन खोत”” ग्रामपंचायत सदस्य आनंदा रामचंद्र खोत”” यूवराज रामचंद्र खोत””यूवा नेते हिंदूराव खोत आदींनी याचा पाटपूरावा केला होता.