बुरुंगवाडी येथे ऊस पिक परिसंवादास शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद

भिलवडी : सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील बुरुंगवाडी येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी कार्यालय पलूस व क्रांती अग्रणीडॉ. जी डी बापू लाड सहकारी साखर कारखाना लि. कुंडल यांच्या संयुक्त विद्यमाने आडसाली ऊस लागवड तंत्रज्ञान याविषयी चर्चासत्र संपन्न झाले. या चर्चासत्रास शेतकरी बांधवांनी चांगला प्रतिसाद दिला.
यावेळी कारखान्याचे ऊस विकास अधिकारी विलास जाधव साहेब यांनी जमीन सुपीकता व ऊस लागवड तंत्रज्ञान याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले त्यानंतर कृषी सहाय्यक संतोष चव्हाण यांनी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. कृषी सहाय्यक पुनम जाधव यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजना याबाबत सविस्तर माहिती दिली व जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपला खरीप पिकाचा विमा उतरावा असे आवाहन केले.
द्राक्ष गुरु वसंतराव माळी सर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना योग्य नियोजन करून ऊस पिकाची लागवड करावी तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा व हवामानातील बदलामुळे आपल्या पिकाचे नुकसान टाळण्यासाठी पिक विमा भरावा असे आवाहन केले. या कार्यक्रमासाठी अर्जुन (भाऊ) जाधव द्राक्ष गुरु वसंतराव माळी सर विनोद पानबुडे व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या आभार जयकर मुळीक यांनी मानले.