कृषी व व्यापारमहाराष्ट्र

सांगली येथे संजयकुमार खारगे यांना उत्कृष्ट मंडळ कृषी अधिकारी पुरस्काराने सन्मानित

महाराष्ट्र शासन कृषी विभाग जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सांगली व जिल्हा परिषद सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी दिन कार्यक्रमाचे आयोजन

 

सांगली : महाराष्ट्र शासन कृषी विभाग जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सांगली व जिल्हा परिषद सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने एक जुलै मा. स्वर्गीय वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस कृषी दिन सांगली येथे  पार पडला. या कार्यक्रमात उत्कृष्ट मंडळ कृषी अधिकारी म्हणून श्री संजयकुमार खारगे मंडळ कृषी अधिकारी पलूस यांचा सन्मान श्री ओसवाल साहेब उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली यांच्या हस्ते करण्यात आला.
श्री खारगे यांनी विस्तार योजनेत सोयाबीन, गहू हरभरा रब्बी ज्वारी प्रकल्प, बीज प्रक्रिया रथाच्या माध्यमातून संपूर्ण तालुक्यात बीज प्रक्रिया मोहीम राबवली. हुमनी किड नियंत्रण, बियाणे उगम क्षमता चाचणी, बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक, गाव बैठका कार्यक्रम, प्रधानमंत्री पिक विमा, पिक स्पर्धा, शेतीशाळा, कार्यक्रम मोहीम स्वरूपात राबवले. तसेच वनराई बंधारे शेततळे एमआरईजीएस फळबाग लागवड, पलुस तालुका शेतकरी उत्पादक कंपनी, पीएमएफएमई अंतर्गत तालुक्यातील 46 शेतकऱ्यांना प्रक्रिया उद्योगांना लाभ दिला. तसेच कृषी यांत्रिकरण ठिबक सिंचन डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती यासारख्या योजना पलूस तालुक्यात प्रभावीपणे राबवल्या. श्री खारगे यावेळी म्हणाले पलूस तालुक्यातील महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत सन 2023 – 24 अंतर्गत कृषी विभागाच्या सर्व योजना उत्तम प्रकारे राबवल्या आहेत या योजना राबवण्यासाठी कृषी सहाय्यक कृषी पर्यवेक्षक यांनी कृषी विभागाच्या योजना गाव पातळीवरील शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधापर्यंत अतिशय उत्कृष्टरित्या राबवल्याबद्दल त्याचे प्रतीक म्हणून हा सत्कार करून सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मा.तृप्ती धोडमिसे जिल्हा परिषद सांगली जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सांगली विवेक कुंभार साहेब जिल्हा कृषी विकास अधिकारी मनोज वेताळ साहेब उपमुख्य कार्यकारी अधिकारी काळे साहेब सायमोते साहेब जील्हातील पुरस्कार प्राप्त शेतकरी पिक स्पर्धा विजेते शेतकरी उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!