खटाव येथे माझी वसुंधरा अभियान अंतर्गत एक कुटुंब एक वृक्ष मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

भिलवडी : माझी वसुंधरा अभियान अंतर्गत खटाव मध्ये एक कुटुंब एक वृक्ष मोहीम शनिवार दिनांक ६ जुलै २०२४रोजी ग्रामपंचायत खटाव तालुका पलूस यांनी चला सावली पेरूया, या अभियानांतर्गत एक कुटुंब एक झाड या संकल्पनेप्रमाणे वृक्षारोपण केले .तसेच माझी वसुंधरा या अभियानांतर्गत धरणी मातीची काळजी घेण्याची प्रतिज्ञा घेतली. गावातील सर्व लोकांना वृक्षारोपणाचे महत्त्व सांगून त्याचे जतन करून त्याचा सेल्फी काढून माझी वसुंधरा या संकेतस्थळावर पाठविण्यास सांगितले. ग्रामस्थांचा या उपक्रमास चांगला सहभाग लागला.याप्रसंगी सरपंच ओंकार पाटील, उपसरपंच श्रीकृष्ण पाटील,ग्रामपंचायत सदस्य संजय कांबळे ,रावसाहेब पाटील,मोनिका पाटील ,सुरेखा पाटील ,अनिता चौगुले, ग्रामसेवक रवींद्र गायकवाड ,तंटामुक्ती अध्यक्ष मारुती भाऊ लाड,पोलीस पाटील मनोज पाटील,दीपक पाटील,शिवाजी पाटील,राजाराम चौगुले,रामचंद्र पवार सर,दिनकर चव्हाण,मधुकर(बापू) पाटील,प्रसाद पाटील,काकासो शिवगोंडा पाटील,रवी पाटील,अनिल पाटील,गजानन गुरव, अवधूत पाटील,विजय पाटील,मनोज कांबळे,वैभव पाटील यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.