भिलवडी येथील सार्वजनिक वाचनालय भिलवडी यांच्या महिला वाचन कट्ट्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

भिलवडी : सार्वजनिक वाचनालय भिलवडी यांचे वतीने महिला वाचन कट्टा क्रमांक एक आज दिनांक सहा जुलै रोजी वाचनालयाच्या अभ्यासिकेत संपन्न झाला वाचन कट्ट्याचे उद्घाटन सौभाग्यवती लीना चितळे वहिनी यांचे हस्ते दीप प्रज्वलन आणि ग्रंथ पूजनाने झाले अध्यक्षस्थानी सौ सुनीता पाटील होत्या या वाचन कट्ट्याचा विषय संतांचे अभंग आणि भक्ती कविता असा होता या वाचन कट्ट्यावर सौ उर्मिला दिसले यांनी जनाबाईंचे अभंग सांगून त्याचे निरूपण केले सौभाग्यवती सरोज गुरव यांनी भक्तीची संकल्पना विशद केली सौ अर्चना किनीकर यांनी निरपेक्ष भक्तीचे महत्त्व सांगितले सौ अपर्णा जोशी यांनी भक्तीची कविता सादर केली सौ प्राजक्ता कुलकर्णी यांनी मनाचे श्लोक सांगून त्याचे सुंदर विवेचन केले प्रिया पवार सौभाग्यवती रूपाली वाळवे वाळवेकर सौभाग्यवती सुनिता पाटील यांनी देखील चर्चेमध्ये सहभाग घेतला वाचन कट्ट्याचे सूत्रसंचालन सौ प्राजक्ता कुलकर्णी यांनी केले यावेळी भिलवडी आणि परिसरातील अनेक वाचक महिला उपस्थित होत्या वाचनालयाचे अध्यक्ष गिरीश चितळे कार्यवाह सुभाष कवडे ज्येष्ठ संचालक डी आर कदम श्री जय कृ केळकर हे देखील या वाचन कट्ट्याच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते श्री गिरीश चितळे आणि सुभाष कवडे यांनी वाचन कट्टा प्रभावीपणे चालवण्यासाठी महिलांना मार्गदर्शन केले प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी दुपारी साडेचार वाजता वाचनालयाच्या अभ्यासिकेत हा वाचन कट्टा संपन्न होणार आहे पुढच्या वाचन कट्ट्यासाठी मी गुरूंच्या संबंधात किंवा गुरु महिमा या संबंधात वाचलेले पुस्तक हा विषय देण्यात आलेला आहे अशा स्वरूपाचा महिलांसाठींचा वाचन कट्टा सांगली जिल्ह्यात सार्वजनिक वाचनालय भिलवडी यांचे वतीने प्रथमच संपन्न होत आहे वाचन कट्टा उपक्रमाचे संयोजन ग्रंथालयातील सौ मयुरी नलवडे सौ विद्या निकम श्री दत्त वामन काटेकर यांनी सुंदरपणे केले