वसगडे येथे सोयाबीन शेतीशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद

पलूस : सांगली जिल्हा वसगडे (ता.-पलूस) येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी कार्यालय पलूस यांचेमार्फत सोयाबीन शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले . या शाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी कृषी सहाय्यक संतोष चव्हाण यांनी सोयाबीन या पिकावरील प्रमुख रोग व किडी याबाबत माहिती दिली कीड,रोग व तणनियंत्रण याबाबत सखोल मार्गदर्शन केले.कृषी सहाय्यक पुनम जाधव यांनी सोयाबीन पिकामध्ये कामगंध सापळ्यांचा वापर आणि त्याचा सोयाबीन पिकामध्ये उपयोग व शासनाच्या विविध योजनांची संपूर्ण माहिती दिली.तसेच जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या सोयाबीन,भुईमुग व भात पिकाचा पिक विमा उतरवावा असे आवाहन त्यांनी केले. शेतीशाळेस उत्स्फुर्त सहभाग मिळाला.
याप्रसंगी सुरगोंडा पाटील, आशिष कुमार पाटील, सचिन पाटील ,भाऊसो झगडे, शिवगोंडा पाटील ,पंकज पाटील, सुदर्शन चौगुले, नितीन पाटील, आशिष पाटील ,राहुल पाटील, सुशांत कोळी ,प्रवीण सुतार ,संजय जतकर, संजय पाटील व इतर शेतकरी उपस्थित होते . आभार श्री सचिन पाटील यांनी मानले.