कोल्हापूरच्या अनुष्का पाटील हिला आंतर विभागीय नेमबाजी स्पर्धेत दोन सुवर्णपदके

कोल्हापूरः अनिल पाटील
कोल्हापूरची आंतरराष्ट्रीय नेमबाज अनुष्का पाटील हिने शिवाजी विद्यापीठ आंतर विभागीय नेमबाजी स्पर्धेत दोन सुवर्णपदके पटकाविली असून तिची नवी दिल्ली येथे होणाऱ्या अखिल भारतीय अंतर विद्यापीठ नेमबाजी स्पर्धेसाठी निवड झाली. अनुष्काने 10 मीटर एअर पिस्तल व 25 मीटर स्पोर्ट्स पिस्तल या दोन्ही गटात निर्विवाद वर्चस्व मिळवत प्रथम क्रमांक प्राप्त केला. या स्पर्धेमध्ये जवळपास 40 महाविद्यालयातून 105 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या यशामुळे अनुष्काची नवी दिल्ली येथे 8 ते 11 डिसेंबर 2023 मध्ये होणाऱ्या 25 मीटर स्पोर्ट्स पिस्तल गटाच्या अखिल भारतीय विद्यापीठ अंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड झाली .तसेच 3 ते 8 जानेवारी 2024 दरम्यान कुरुक्षेत्र ,हरियाणा येथे होणाऱ्या साऊथ वेस्ट झोन युनिव्हर्सिटी शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी ही अनुष्का शिवाजी विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणार आहे .