महाराष्ट्र

सांगली : ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर

 

सांगली  राज्यातील माहे जानेवारी 2024 ते  डिसेंबर 2024 या कालावधीत मुदत संपणाऱ्या, नवनिर्मित, मागील निवडणुकांमध्ये चुकीची प्रभागरचना झाल्यामुळे तसेच बहिष्कार व इतर कारणांमुळे निवडणुका न होऊ शकलेल्या सुमारे 1 हजार 588 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तसेच निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे ग्रामपंचायतीतील सदस्य / थेट सरपंचाच्या रिक्त झालेल्या जागांच्या पोटनिवडणुकांसाठी पारंपारिक पध्दतीने राबविण्यात यावयाच्या मतदार यादीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने घोषित केला आहे. एप्रिल-मे 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणूक 2024 साठी वापरलेली विधानसभेची मतदार यादी यापुढे होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक/पोटनिवडणुकांसाठी मतदार यादी तयार करण्यासाठी वापरण्यात येणार आहे.

            या निवडणुकांकरिता पारंपारिक पध्दतीने राबविण्यात यावयाचा मतदार यादीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.  प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक मंगळवार, 9 जुलै 2024. हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी मंगळवार, 9 जुलै 2024 ते सोमवार, 15 जुलै 2024 पर्यंत आणि प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक शुक्रवार, 19 जुलै 2024 असा असल्याचे उपजिल्हाधिकारी (महसूल) राजीव शिंदे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!