महाराष्ट्र

सांगली शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत 4 जुलै रोजी रोजगार मेळावा   सहायक आयुक्त जमीर करीम

 

 

सांगली: जिल्हास्तरीय पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा अंतर्गत शिकाऊ उमेदवार पदासाठी गुरुवार, 4 जुलै 2024 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार अर्ज करुन प्रत्यक्ष मुलाखतीसाठी दि. 4 जुलै रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेमध्ये शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (Govt. I.T.I),गोविंदराव मराठे इंडस्ट्रीयल इस्टेट, माधवनगर रोड, सांगली येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त जमीर करीम व  शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य व्ही.बी. देशपांडे यांनी केले आहे.

खाजगी क्षेत्रात, लहान, मध्यम व मोठे उद्योजक व कारखाने यांना आवश्यक असणारे मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी व समाजात दिवसेंदिवस वाढणारी बेरोजगारीची समस्या दूर करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सांगली आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यामध्ये शिकाऊ उमेदवार पदांसाठी एकूण 10 खाजगी नामवंत कंपन्या सहभागी होणार असून एकूण 238 पदे भरण्यात येणार असल्याचे श्री. करीम यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!