महाराष्ट्रकृषी व व्यापार

प्रधानमंत्री पीक विमा योजनेबाबत सी.एस.सी. केंद्र चालकांची कार्यशाळा उत्साहात

 

 

        सांगली   खरीप हंगाम 2024 साठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये सहभाग घेण्यास  १५ जून २०२४ पासून सुरुवात झाली असून अंतिम मुदत १५ जुलै २०२४ आहे. एक रुपयात पीक विमा हप्ता भरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेमध्ये सहभाग नोंदवावा. सीएससी चालकांनी एक रुपये पीक विमा हप्ता व्यतरिक्त कोणतेही जादा शुल्क आकारू नये, अशा सूचना जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार यांनी विद्यमाने  सी.एस.सी. केंद्र चालकांसाठी आयोजित एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेत दिल्या.

            भारतीय कृषी विमा कंपनी व कृषि विभाग सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने  सी.एस.सी. केंद्र चालकांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण वर्गाचे नुकतेच  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात  आयोजन करण्यात आले होते. यावेळी भारतीय कृषी विमा कंपनी क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक उपप्रबंधक नितीन स्वर्णकार, कृषी उपसंचालक डी. एम. पाटील, सीएससी जिल्हा व्यवस्थापक समीर कांबळे, कंपनीचे सांगली जिल्हा व्यवस्थापक प्रीतम कांबळे, सांख्यिकी शाखेचे सचिन कोरटे, एम. एम. घोडके यांच्यासह सी.एस.सी केंद्रचालक उपस्थित होते.

            या प्रशिक्षण कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते पीक विमा प्रचार प्रसिद्धीच्या साहित्याचे विमोचन करण्यात आले. या प्रशिक्षणात प्रामुख्याने केंद्र शासनाचे या योजनेविषयीचे उद्दिष्ट, सी.एस.सी चालकांचे कर्तव्य, जबाबदाऱ्या याबाबत मार्गदर्शन तसेच चालू वर्षापासून केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या पीक विमा संदर्भात असणाऱ्या शंका समाधानासाठी 14447 हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!