भिलवडी परिसरात काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ.विश्वजीत कदम यांच्या प्रचारासाठी ऋषीकेश लाड, सागर कदम सक्रिय

भिलवडी:
भिलवडी परिसरात पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ.विश्वजीत कदम यांचा प्रचाराला मध्ये युवा नेते ऋषिकेश दादा लाड, युवा नेते सागर कदम प्रचारात सक्रिय झाले आहेत.पलूस तालुक्यातील माळवाडी, भिलवडी, अंकलखोप, औदुंबर येथे ते मतदार बंधू भगिनी यांच्यासोबत संवाद साधत आहेत. पलूस – कडेगांव मतदारसंघात स्व.डॉ.पतंगराव कदम यांनी कशा पद्धतीने येथे काम केले. आणि तोच वारसा डॉ.विश्वजीत कदम कसा पुढे चालवतात हे पटवून देत आहेत. त्यांच्यासोबत गावातील ज्येष्ठ मंडळी, तरूण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. पलूस तालुक्यात युवा नेते सागर कदम यांची मोठी क्रेझ असून युवक त्यांना गराडा घालत असल्याचे चित्र आहे. अगदी आ.डॉ.विश्वजीत कदम यांच्यासारखे ते ज्येष्ठ मंडळींना वाकून नमस्कार करत त्यांचे आशीर्वाद घेत आहेत, युवकांची मते आजमावत आहेत. ग्रामस्थांना डॉ.विश्वजीत कदम यांनी मतदारसंघात किती विकासकामांचा डोंगर उभा केला आहे हे सागर कदम सांगताना दिसत आहेत. महापूर, कोरोना यात आलेले अनुभव आणि आमदार कदम यांनी केलीली मदत जनता सागर कदम यांना सांगून तुम्ही काहीही चिंता करू नका ‘आम्ही तुमच्यासोबत’ असल्याचा विश्वास देत आहे. एकूणच पलूस तालुक्यात नेते महेंद्र लाड, सागर कदम, ऋषिकेश लाड हे मतदारांपर्यंत पोहोचत आहेत.