समाजसेविका, ज्ञान ज्योती शिक्षिका शैलजा ईश्वरा चौधरी एक आदर्श..!

भिलवडी येथील भिलवडी शिक्षण संस्थेमध्ये असणाऱ्यां समाजसेविका ज्ञान ज्योती- शिक्षिका शैलजा ईश्वरा चौधरी यांच्या सेवानिवृत्त निमित्ताने….
भिलवडी शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूल , ज्युनियर काॅलेजच्या जेष्ठ शिक्षिका आदरणीय शैलजा ईश्वरा चौधरीमॅडम, ३९ वर्षाच्या प्रर्दीघ शैक्षणिक सेवेतून दि. ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाल्या आहेत. प्रसिद्ध माध्यमापासून चार हात लांब राहून अव्याहतपणे मॅडमनी शैक्षणिक सेवा केली. सेवानिवृत्तीनंतर आम्ही त्यांना भेटलो, तितक्याच उत्साह, आपुलकीचे दर्शन झाले. त्यांच्या शैक्षणिक कार्याचा थोडक्यात मागोवा आपणासमोर सादर करीत आहे…. मे महिन्यात सेवानिवृत्त,शाळेला सुट्टी, खर तर परिक्षा संपलेल्या पेपर तपासणीचे काम सुरू झाले.पुढे मे महिन्याची सुट्टी, चौधरी मॅडम दिवसभराचे काम ओटपून घरी जात होत्या. दोन हात जोडून, प्रत्येकास नमस्कार करीत होत्या आणि डोळे पाणावले हे मी जवळून पहिले.आपली कर्मभूमीस निरोप देताना, त्यानां दुख: अनावर झाले होते.मित्र हो, भिलवडी शिक्षण संस्था संकुलात हा पहिला प्रसंग मी पहिला, अन् माझे डोळे पाणावले. खरी तळमळ काय असते, याची प्रचिती मला आली. आता सेवानिवृत्ती म्हणंटल कि, चौधरी मॅडम यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव, परंतु जनसामान्यांसाठी अहोरात्र राबणारे त्यांचे हात खरंच अभिमानस्पद आहेत.चौधरीमॅडमचे तासगाव जन्मगाव, प्राथमिक शिक्षण मालगांव येथे तर माध्यमिक शिक्षण श्री राम विद्यामंदिर जत येथे पूर्ण केले. बी. ए. डी. एड्. ही शैक्षणिक अहऺता त्यांनी प्राप्त केली. स्व. तारेसर, स्व. माईनकर सर, स्व. रा. कॄ. कदम, स्व. वा. ग. गोसावी, स्व. डॉ. चंद्राताई शेणोलीकर, तात्कालिन भिलवडी शिक्षण संस्था कार्यकारी मंडळ,श्री. जोग सर यांच्या अथक सहकार्याने भिलवडी शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूल येथे दि १/१०/१९८५ रोजी सहाय्यक शिक्षिका पदी रुजू झाल्या. त्यांचे पती स्व.ईश्वरा शंकर चौधरीसर हे जय भारत विद्यालय, वसगडे येथे शैक्षणिक सेवेत होते. आदरणीय शैलजा चौधरी मॅडमना शैक्षणिक सेवेचे धडे, मार्गदर्शन सरांच्या कडून लाभले, हीच खरी चौधरी मॅडम ची प्रचंड शैक्षणिक ताकद होती.अत्यंत कष्टाने त्यांनी संसार उभा केला.गणित, मराठी, इतिहास हे विषय मॅडम सेकंडरी स्कूल येथे विद्यार्थ्यांना शिकवत होत्या.त्यांची शिकवण्याची सुरुवातच’ बाळानो’ या शब्दाने सुरू होते.लाखो विद्यार्थीनां शालेय शिक्षणाबरोबरच शिस्तचे धडे दिले.इ. ५ ते इ. ७ वी इयत्तेतील विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप, गणित प्रविण्य परिक्षा, इ. ५ वी. इतिहास प्रज्ञा शोध परिक्षा इ. परिक्षेचे ३५ वर्ष मार्गदर्शन केले या सर्व विद्यार्थी जिल्हा व राज्य पातळीवर चमकले. इ. ५ वी. नवोदय परिक्षेचे मार्गदर्शन सलग ३५ वर्ष त्यांनी केले. तसेच विद्यार्थी हस्ताक्षर सुधारणा करण्यात त्या नेहमी आग्रही होत्या त्याचबरोबर वाचन लेखन सुधारणे,पाढे पाठांतर यावर विशेष भर दिला.इ. १० वी च्या विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले. सन १९९४ च्या दहाव्या बॅचच्या विद्यार्थी बंधू,भगिनी यांनी ‘चौधरी मॅडम The great Guru’ ही खास लेखमाला प्रसिद्ध करुन,मॅडम चे ॠण व्यक्त केले आहेत ही खरच कौतुकास्पद बाब आहे.. विशेष बाब म्हणजे खोखो खेळाचे शास्त्रशुध्द शिक्षण विद्यार्थ्यांना मॅडमनी दिले. अनेक विद्यार्थी जिल्हा व राज्य पातळीवर चमकले. आपल्या शैक्षणिक सेवेत, संस्था व शाळा यांचा शैक्षणिक दर्जा सुधारणेसाठी त्यांनी नेहमी प्रयत्न केले. गरजू व गरीब विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन, शालेय शिक्षणाचा भार त्यांनी उचलला आहे. चौधरी मॅडम यांचा आवाज स्पष्ट व मोठा, नेहमीच त्यांचा तास कोणत्या वर्गावर आहे, हे कोणालाही सांगावे लागत नव्हते. भिलवडी शिक्षण संस्था अमॄतमहोत्सवी ७५०० ग्रंथ भेट अभियानासाठी आपण मदत करावी, अशी विनंती केली.तात्काळ त्यांनी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचा चेक माझे नांवे दिला.व मला म्हणाल्या, विद्यार्थ्यांना चांगली पुस्तके आणावी त. ७५०० रुपयांची पुस्तके भेट दिली. या बद्दल मी मॅडमचे मनपूर्वक आभार मानतो.त्यांनी संस्था व शाळा पदाधिकारी यांना नेहमीच सहकार्य केले.शाळेनी दिलेली जबाबदारी निरपेक्ष वृत्तीने पूर्ण केली. शाळेतील शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर सेवक, भिलवडी शिक्षण संस्था विभाग कार्यरत सेवक वर्ग यांचेशी सलोख्याची, सहकार्याची वॄत्ती होती. सदैव तणावमुक्त स्वभाव, आदराची वागणूक, संयमी, शांत मितभाषी स्वभाव यामुळे त्यांनी हजारो सहकारी लाभले.सेवा काळात आपल्या सहकारी शिक्षक बंधू, भगिनी,शिक्षकेतर सेवक यांच्या सुखदुःखात सहभागी झाल्या. मॅडम यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन दि. १० मे २०१४ रोजी शिक्षण सेवक सहकारी सोसायटी,सांगली यांचे कडून ‘आदर्श शिक्षक रत्न’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे तसेच फेब्रुवारी २०१५ मध्ये ‘श्रमजीवी आदर्श शिक्षक रत्न’ राज्य पुरस्कार मुंबई येथे प्रदान करण्यात आला. शिक्षण क्षेत्राबरोबरच सामाजिक व राजकीय त्यांनी केलेले काम खरंच उल्लेखनीय आहे. सन १९९२ ते १९९६ व २०१२ ते २०१३ या कालावधीत माळवाडी गावाचे सरपंच पद भूषविले. आज गटागटाचे राजकरण सुरू असताना निर्भीडपणे ‘सरपंच ‘ म्हणून त्यांनी केलेली कामे आज ही आदर्शवत आहे. सन १९९४-९५ मध्ये जि. प. शाळा व पाण्याची टाकी बांधकाम करण्यात मोलाचे योगदान दिले. शासनाच्या मदतीने घरकुल लोकांना बांधून दिली. गटारी, रस्ते, बोअरवेल, अंगणवाडी या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले, पूर्ण केल्या. तसेच बाजार कट्टा, वॄक्षारोपण, शिवाजीनगर येथे भगीरथ योजनेतून ५२ विजेचे डांब उपलब्ध करून, दिवाबत्तीची सोय केली. अशा प्रकारे आपल्या सरपंच पदाच्या कालावधीत माळवाडी गांवाचा सर्वाधिक विकास केला, याचे श्रेय चौधरी मॅडम यांचे आहे. शिक्षण व सामाजिक कार्यासाठी त्यांना साथ लाभली, स्व. ईश्वरा शंकर चौधरीसरांची. दि. २८ जुलै २०२१ रोजी, आयुष्यभर ज्यानी प्रेरणा दिली, ताकद दिली ते ईश्वरा शंकर चौधरीसर यांचे निधन झाले. मॅडमना प्रचंड मानसिक धक्का बसला. स्व. ईश्वरा चौधरी सर नामवंत शिक्षक होते. दांडगा लोकसंपर्क, हजारो विद्यार्थी घडवले, संसाराचा रथ पुढे नेत असताना, मॅडमना त्यांनी साथ दिली.त्यांच्या स्मृतींना शैलजा चौधरी मॅडम यांच्या सेवानिवृत्ती समारंभ निमित्ताने मी भिलवडी शिक्षण संस्था संकुल यांचे वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत आहे. चौधरी कुटुंबीय सुशिक्षित मुली उषा देवी प्राध्यापक म्हणून, वॄषाली डॉक्टर आहेत, मुलगा विनायक M. B. A. शिक्षण घेऊन, माळवाडी येथे पोलीस पाटील म्हणून कार्यरत आहेत. जनसामान्यांना दिलासा देऊन, सामाजिक कार्य करीत आहे. स्पर्धा परीक्षा वर्गास मार्गदर्शन करीत आहेत.सौ. विशाखा विनायक चौधरी गॄहिणी तर कु. मनस्वी,शिवानी,शुभश्री हा बालचमू सदैव मॅडमच्या अवतीभवती असतो. अशा प्रकारे अत्यंत संवेदनशील , मितभाषी, शांत, संयमी आदरणीय शैलजा ईश्वरा चौधरी मॅडम यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा मागोवा आपणासमोर सादर केला आहे. दि. २२ जून रोजी भिलवडी शिक्षण संस्था अध्यक्ष आदरणीय विश्वास चितळे सर, संस्था व शाळा पदाधिकारी, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर, भिलवडी शिक्षण संस्था संकुल सेवक वर्ग, नातेवाईक, मित्र मंडळी,माजी विद्यार्थी यांच्या उपस्थितीत सेवानिवृत्त समारंभ संपन्न होत आहे. आदरणीय मॅडम नां उत्तम आरोग्य लाभो, अशाच प्रकारे शैक्षणिक व सामाजिक कार्य त्यांच्या हातून घडो. भिलवडी शिक्षण संस्था संकुल, भिलवडी व माळवाडी परिसरातील तमाम नागरिकांचे वतीने हार्दिक शुभेच्छा…..
. संकलन… संजय तावदर, ग्रंथालय परिचर, बाबासाहेब चितळे, भिलवडी.