महाराष्ट्र

सांगली : इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाकडील योजनांचा लाभ घेण्‍याचे आवाहन  

 

            सांगली महाराष्ट्र राज्य इतर मागावर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित हे शासनाच्या इतर मागा बहुजन कल्याण विभागांतर्गत कार्यरत असून या महामंडळाकडून इतर मागासवर्ग प्रवर्गातील व्यक्तींना स्वयंरोजगाराकरीता तसेच उच्च शिक्षणासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करुन देते. महामंडळामार्फत 20 टक्के बीज भांडवल योजनाथेट कर्ज योजनावैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजनागट कर्ज व्याज परतावा योजनाशैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनामहिला स्वयंसिध्दी व्याज परतावा योजना व कौशल्य विकास प्रशिक्षण योजना अशा विविध कर्ज योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी इतर मागास प्रवर्गातील गरजू व्यक्तींनी www.msobcfdc.org/msobcfdc.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज दाखल करावेत. अधिक माहितीसाठी महामंडळाच्या सांगली जिल्हा कार्यालयास संपर्क करावाअसे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक रविंद्र दरेकर यांनी केले आहे.

व्याज परतावा योजनेमध्ये बँकेकडून घेतलेल्या कर्जाचे व्याज 12 टक्के र्यंत महामंडळाकडून अदा करण्यात येते. यामध्ये सर्व राष्ट्रीयकृत बँकाखाजगी बँका तसेच सहकारी बँकांचा समावे करण्यात आलेला आहे.

            1) वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना (रु. 10 लक्ष पर्यंत) – बँकेने 10 लाख रूपये पर्यंतच्या लाखापर्यंतच्या मर्यादे कर्ज मंजूर केलेल्या अर्जदाराने कर्जाचे हप्ते वेळेत /नियमित भरल्यानंतर व्याजाची रक्कम (१२ टक्के मर्यादेत) अर्जदाराच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येते. ही योजना संपूर्णपणे संगणकीकृत आहे.

        2) गट कर्ज व्याज परतावा योजना (रु.१० लक्ष ते ५० लक्ष पर्यंत) – फक्त महाराष्ट्रातील इतर मागासवर्गीय प्रवर्गातील महामंडळाच्या निकषांनुसार विहित केलेल्या वार्षिक उत्पन्न मर्यादेतील उमेदवारांच्या बचत गटभागीदारी संस्था, सहकारी संस्थाकंपनी (कंपनी अधिनियम 2013 अंतर्गत)LLP, FPO अशा शासन प्रमाणिकरण प्राप्त संस्थांना बँकेमार्फत स्वयंरोजगार उद्योग उभारणीकरीता जे कर्ज दिले जाईलत्या कर्ज रक्कमेवरील व्याज परतावा हा बँक प्रमाणिकीकरणानुसार महामंडळाकडून दा केला जाईल. ही योजना संपूर्णपणे संगणकीकृत आहे.

        3) महिला स्वयंसिध्दी व्याज परतावा योजना (रु.५.०० लक्ष ते १०.०० लक्ष पर्यंत)– राज्यातील महिला बचत गटातील इतर मागास प्रवर्गातील महिलांनी उत्पादीत केलेल्या वस्तुंचे उत्पादनप्रक्रियामुल्य आधारित उद्योगाकरीता बँकेमार्फत मंजूर करण्यात आलेल्या 5 लक्ष ते 10 लक्षपर्यंत कर्ज रक्कमेवरील 12 टक्के व्याजाचा परतावा उपलब्ध करून देण्यात येईल. ही योजना महिला आर्थिक विकास महामंडळाच्या लोकसंचलित साधन केंद्र (CMRC) च्या सहाय्याने राबविण्यात येणार आहे.

        4) शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना (रु.१० लक्ष ते २० लक्ष पर्यंत) – उच्च शिक्षणासाठी राज्य, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याकरीता इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थी/विद्यार्थीनींना बँकेमार्फत उपलब्ध होणाऱ्या शैक्षणिक कर्ज रक्कमेवरील व्याजाचा परतावा करणेइतर मागास प्रवर्गातील विद्यार्थी/विद्यार्थीनींना उच्च शिक्षणासाठी बँकेकडून राज्यांतर्गत  देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी 10 लक्ष रूपये व परदेशी अभ्यासक्रमासाठी 20 लक्ष रूपये इतके महत्तम कर्ज अदा करण्यात येईल.

        अर्ज करण्याची कार्यपध्दती – अर्ज करण्यासाठी वेबसाईट www.msobcfdc.org असून महामंडळाच्या वेबसाईटवर गेल्यानंतर MENU मध्ये कर्ज योजनेचा अर्ज दाखल करण्यासाठी NEW REGISTRATION मध्ये जावून USER ID & PASSWORD तयार करुन संपूर्ण माहिती भरावीअर्जासोबत फोटो, आधार कार्डपॅन कार्ड, रेशन कार्ड, लाईट बील/टॅक्स पावतीरहिवासी दाखलाबँक पासबुकउत्पन्नाचा दाखला (तहसिलदार यांचेकडील)जन्माचा दाखला, शैक्षणिक पुरावाजातीचा दाखला इत्यादी मुळ कागदपत्र स्कॅन करुन लोड करावीत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!