सांगली जिल्हा न्यायालय येथे योगदिन उत्साहात

सांगली, : जागतिक योग दिनाचे औचित्य साधून आज सकाळी 7 ते 8 या वेळेत जिल्हा न्यायालय, विजयनगर, सांगली येथील आवारात जिल्हा न्यायालय सांगली, विधी सेवा प्राधिकरण सांगली, वकील बार असोसिएशन सांगली, न्यायालयीन कर्मचारी संघटना सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा न्यायालय सांगली येथील प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. डी. निंबाळकर, सांगली मुख्यालयातील सर्व न्यायिक अधिकारी, सांगली वकील संघटनेचे अध्यक्ष किरण रजपूत, जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे आदी उपस्थित होते.
या योग दिन कार्यक्रम प्रसंगी सहाय्यक सरकारी वकील व्ही. एम. देशपांडे यांनी योग दिनाचे महत्व सांगितले व मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य चांगले ठेवण्याकरीता रोज एक तास योगव्यायाम केला पाहिजे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. योग शिक्षिका डॉ. स्मिता अनगळ, योग निसर्गोपचार व अॅक्युप्रशेर तज्ञ व रेवती शिंदे यांनी योगासनाचे विविध प्रात्याक्षिक प्रकार उपस्थितांना करवून दाखवले व सर्व उपस्थितांनी याचा लाभ घेतला.
सूत्रसंचालन तेजश्री सांळुखे, आभार सहाय्यक सरकारी वकील व्ही. एम. देशपांडे यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गि. ग. कांबळे, न्यायालयाचे प्रभारी प्रबंधक एस. एस. जाधव, विधी सेवेचे अधिक्षक महेश गुर्लहसूर, सहाय्यक कर्मचारी सचिन नागणे, नितिन आंबेकर, विजयकुमार माळी, गौस नदाफ यांनी केले.