*हौशी गोमंतकीय कलाकारांसाठी फिल्म ऑडिशन्स*
पणजी : हौशी गोमंतकीय कलाकारांना चित्रपटांमध्ये अभिनय करण्याची संधी मिळावी म्हणून आयएनएन भारत मुंबई, सी. ई. मीडिया प्रॉडक्शन्स गोवा आणि माधव चितळे प्रॉडक्शन्स, पुणे या संस्थांनी संयुक्तपणे विनामूल्य फिल्म ऑडिशन्सचे आयोजन केले आहे.
आयएनएन भारत मुंबई, सी. ई. मीडिया प्रॉडक्शन्स गोवा आणि माधव चितळे प्रॉडक्शन्स, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने गोव्या मधील विविध स्थळांवर चित्रिकरण होणाऱ्या आगामी हिंदी – मराठी चित्रपट आणि ओटीटी – दूरचित्रवाहिनी मालिकांमध्ये अभिनयाची संधी देण्यासाठी दोन दिवसीय मोफत ऑडिशन्स आणि मार्गदर्शन सेशनचे आयोजन केले आहे.
आयएनएन भारत मुंबई यांची ही निर्मिती क्रमांक 3 असून त्यांनी आपल्या निर्मिती क्रमांक 4 साठी येत्या शनिवारी 22 जून आणि रविवारी 23 जून सकाळी 10 ते 7 या वेळामध्ये पणजी शहरात मोफत ऑडिशन्स आणि मार्गदर्शन सेशन आयोजित केले आहे.
सदर ऑडिशन्स आणि मार्गदर्शन सेशन मध्ये सहभागी होण्यासाठी 9322249455 या व्हाट्सअप वर आधी आपली माहिती पाठवून अधिक माहिती साठी याच मोबाईल वर संपर्क साधावा. येत्या शनिवारी आणि रविवारी सकाळी 10 ते 7 या वेळामध्ये पूर्व संपर्क साधून उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे. तीन ऑस्कर पुरस्कार विजेता हॉलिवूड निर्देशक रॉजर क्रिस्टियन यांचे असोसिएट अभिनेता-लेखक-निर्देशक आणि पत्रकार करण समर्थ हे आयएनएन भारत मुंबई संस्थेचे संस्थापक आहेत. तर महाराष्ट्र कॉडरचे सेवानिवृत्त डिआयजी आयपीएस अधिकारी डॉ माधव चितळे यांची ही दुसरी चित्रपट सहनिर्मिती आहे. तर गोव्याचे नम्र सह-निर्मात्या श्रीमती. दिवंगत कॅप्टन डी.जी. सावंत यांच्या पत्नी सरिता दत्ताराम सावंत आणि त्यांचा मोठा मुलगा हितेन यांनी पहिल्यांदाच चित्रपट सहनिर्मितीत भाग घेतला आहे.
तरी जास्तीत जास्त इच्छुक गोमंतकीय कलाकारांनी या मोफत ऑडिशन्सचा लाभ घ्यावा, अशी माहिती करण समर्थ यांनी दिली आहे. त्यांच्या कडून आपली कलात्मक ऊर्जा चॅनलाईज करा आणि अभिनयाच्या संधी मिळवा.



