मौजे जवळे दुमाला येथील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

दर्पण न्यूज धाराशिव: (प्रतिनिधी संतोष खुणे) :- धाराशिव तालुक्यातील मौजे जवळे दुमाला येथील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना कर्तव्यात कसूर केल्यामुळे पंचायत समिती धाराशिव कडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
श्री प्रकाश गणपती सोनार जवळे दुमाला यांनी माहिती अधिकार अधिनियम 2005 मधील कलम 6(1)अन्वये दिनांक 29.07.2025 रोजी विनंती अर्ज देऊन जवळे दुमाला येथील ग्रामपंचायत मधील आपले सरकार सेवा केंद्र मागील काही वर्षापासून बंद आहे तसेच या केंद्रातून नागरिकांना शासनाच्या ऑनलाइन सेवा मिळत नाहीत त्यामुळे त्या संबंधातील माहिती मागितली होती, परंतु ग्रामपंचायत अधिकारी श्री मेनकुदळे बी एम यांनी 30 दिवसाच्या आत माहिती पुरविणे बंधनकारक असताना देखील माहिती दिलेली नाही त्यामुळे त्यांनी कर्तव्यात कसूर करून महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम 1967 मधील नियमाचा भंग केलेला असल्याने त्यांचे विरुद्ध महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम 1964 मधील तरतुदीनुसार आपणाविरुद्ध कारवाईका करण्यात येऊ नये? याबाबतचा खुलासा सदरची नोटीस मिळाल्यापासून सात दिवसाच्या सादर करण्यास आदेशित केले आहे, खुलासा प्राप्त न झाल्यास किंवा असमाधानकारक असल्यास आपणाविरुद्ध योग्य ती कारवाई अनुसरण्यात येईल याबाबत गटविकास अधिकारी पंचायत समिती, धाराशिव यांनी ग्रामपंचायत अधिकारी श्री मेनकुदळे बी एम. ग्रामपंचायत जवळे दुमाला यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे