भिलवडी येथील बाबासाहेब चितळे महाविद्यालयात दर्जेदार शिक्षण; विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, पालकांनीही सहकार्य करावे : संस्थेचे विश्वस्त उद्योगपती गिरीश चितळे
भिलवडी शिक्षण संस्थेच्या बाबासाहेब चितळे महाविद्यालयात पत्रकार परिषद
भिलवडी: सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील भिलवडी शिक्षण संस्थेच्या बाबासाहेब चितळे महाविद्यालयातील विविध शाखांमध्ये दर्जेदार शिक्षण मिळते. यामुळे बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित करावा, पालकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन भिलवडी शिक्षण संस्थेचे विश्वस्त चितळे उद्योग समूहाचे उद्योगपती गिरीश चितळे यांनी पत्रकार परिषदेत केले.
उद्योगपती गिरीश चितळे यांनी सांगितले की, बाबासाहेब चितळे महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थी घडविण्यासाठी आमचा प्रयत्न असतो. या महाविद्यालयातील विद्यार्थी चांगल्या पदावर काम करीत आहेत. विद्यार्थ्यांना तज्ज्ञ शिक्षक मार्गदर्शन करीत असतात. बरेच विद्यार्थी आमच्या संस्थेच्या प्राथमिक, माध्यमिक , उच्च माध्यमिक तेथून शिक्षण घेत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांशी लहानपणापासूनच संवाद आणि जवळीक साधली जाते. त्यामुळे भिलवडी आणि आसपासच्या परिसरातील पालकांनी आपल्या मुलांना भिलवडी शिक्षण संस्थेच्या बाबासाहेब चितळे महाविद्यालयात प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन गिरीश चितळे यांनी केले.
भिलवडी शिक्षण संस्था , भिलवडी . ही सांगली जिल्ह्यातील एक प्रतिथयश शिक्षण संस्था आहे. शिक्षण संस्थेने मुलींच्या शिक्षणासाठी ५ ऑगस्ट १९९५ रोजी बाबासाहेब चितळे महाविद्यालयाची स्थापना केली इ. स. १९९५ ते आजपर्यंत महाविद्यालयाने अत्यंत भरीव अशी कामगिरी केली आहे . उच्च शैक्षणिक दर्जा राखत विद्यापीठ गुणवता यादी सातत्याने मिळणाऱ्या शिष्यवृत्ती , हॉलीबॉल आणि पोहणे या खेळतील भरीव कामगिरी केली आहे इ.स. २०१६ -१७ या शैक्षणिक वर्षापासून परिसराची गरज म्हणून महाविद्यालयात विज्ञान शाखा सुरु केली आहे. या नूतन विज्ञान शाखेने देखील गेल्या ५ वर्षात शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता यादीत अग्रक्रम मिळविला आहे. स्थानिक ( भिलवडी ) परिसर येथील इ.१२ वी ( कला व विज्ञान ) शाखेतून उतीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी बाबासाहेब चितळे महाविद्यालया मध्ये प्रवेश घ्यावा. ग्रामीण भागात उत्तम मैदान , उत्तम ग्रंथालय , ऑनलाईन ग्रंथालयाची देखील व्यवस्था शास्त्रशाखेसाठी लागणाऱ्या सर्व सुसज्ज प्रयोगशाळा, उच्च विद्याविभूषीत शिक्षक वर्ग , स्पर्धा परीक्षांसाठी व्यावसायिक पद्धतीने दिले जाणारे प्रशिक्षण वर्ग , पोलीस प्रशिक्षण वर्ग , शैक्षणिक सहलीचे आयोजन , राष्ट्रीय सेवा योजना , सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव , स्री समुपदेशन केंद्रामार्फत मुलींच्या विविध कोर्सेसचे आयोजन , शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन , इंग्रजी भाषासुधार वर्ग इ. उपक्रम प्रतिवर्षी आयोजित केले जातात. याच शैक्षणिक वर्षात महाविद्यालयास नॅक कडून B + मानांकन मिळाले आहे. यावर्षी महाविद्यालयामध्ये A I हा कोर्स सुरु करण्याचा प्रयत्न आहे, विद्यालयाचे प्राचार्य दीपक देशपांडे यांनी आणि शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉ चोपडे यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला भिलवडी शिक्षण संस्थेचे संचालक तावदर, सचिव मानसिंग हाके, शिक्षक आणि इतर उपस्थित होते.