
कोल्हापूरः अनिल पाटील
राधानगरी तालूक्यातील कसबा वाळवे गावच्या हद्दीत पशूखाद्य कारखाण्याजवळील उजव्या कॅनाॅलमधील वाहात्या पाण्यात अंदाजे 35 ते 38 वर्ष असलेल्या सावळ्या रंगाचा मूतदेह तरंगतानां राधानगरी पोलिसानां काल दूपारी आढळून आला .हा मूतदेह पाहाण्यासाठी ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. काल सायंकाळी या मूतदेहाचे शवविच्छेदन सी पी आर हाॅस्पीटलमध्ये करण्यात आले. या मूतदेहा बद्दल कोणाला अधिक माहीती असेल तर त्यांनी राधानगरी पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहान पोलिस निरिक्षक संतोष गोरे यांनी केले आहे. या घटनेचा तपास पो.हे. काँ .खामकर करत आहेत.